मनसेचा इशाऱ्यानंतर केली बैल बाजार परीसराची स्वच्छता !!


मनसेचा इशाऱ्यानंतर केली बैल बाजार परीसराची स्वच्छता !!

कोपरगाव संजय भारती प्रतिनिधी :

कोपरगावात शेतीमाल विकण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना नेहमीच्या जागी भाजीमंडई व भांगरे मार्केट मध्ये जागा अपुरी पडत त्यांना बैल बाजार या ठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देन्यात आली परंतु बैलबाजार परीसरात घाणीचे साम्राज्य पसरले असुन मुतारीचा वास तसेच डासांचा त्रासामुळे शेतकऱ्यांना या जागी बसणे अवघड झाले होते.व शेतकऱ्यांना व भाजी पाला खरेदी करणाऱ्या नागरीकांना विविध अडचणीचा सामना करावा लागत होता स्वछतेचा अभावामुळे ग्राहक भाजीपाला खरेदी करण्यासाठी येत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते हि गोष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निर्देशनास येताच.त्यांनी सदर परीसराची साफसफाई करुन त्यांना अोटे बांधून द्यावे.जेणे करुन रस्त्यावरील व्यक्ती बाजारात येऊन भाजीपाला खरेदी करू शकतो तसेच शेतकरी बांधवासाठी लवकरात लवकर स्वच्छता करुन त्यांना बसण्याची जागा व्यवस्थित करुन द्यावी.यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असे निवेदन कृषी उत्पन्न बाजार समितीला अलीकडेच दिले होते आज त्या प्रयत्नांना यश आले असुन कृषी उत्पन्न बाजार समिती ने मनसे पदाधिकाऱ्याच्या समक्ष जेसीबी व इतर साधनांचा साह्याने तेथील साफसफाई केली आहे 

कोपरगाव शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहराध्यक्ष सतिष काकडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नागरीकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी तहसिल प्रशासन, नगरपालिका, महावितरण कंपनी यांना वेळोवेळी निवेदन दिले असुन वेळ पडेल तेव्हा मनसे स्टाईल ही दाखवली आहे. मनसेने सुरू केलेल्या या आंदोलनाचे शहरवासियांनी तसेच शेतकरी बांधवांनी कौतुक करून आभार मानले आहे. या वेळी सतिष काकडे शहराध्यक्ष अलिम शहा ता.अध्यक्ष अनिल गाडे विजय सुपेकर रघुनाथ मोहिते बंटी सपकाळ नितिन त्रिभुवन जावेदभाई शेख सचिन खैरे आनंद परदेशी सागर महापूरे नवनाथ मोहिते बापू काकडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते यांच्या

जाहिरात
Search
विडिओ
Recent News