गुन्हेगारांना कठोर शासन करा विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर चाकण मधील थोपटवाडी येथील घटनास्थळी दिली भेट


गुन्हेगारांना कठोर शासन करा विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर चाकण मधील थोपटवाडी येथील घटनास्थळी दिली भेट

विठ्ठल होले पुणे

पुणे दि. २६ जुलै- चाकणमधील एका युवतीला विवस्त्र करुन तिची निघृण हत्या प्रकरणातील घटनेमधील गुन्हेगारांना कठोर शासन करण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली. 

पुणे जिल्ह्यातील चाकण मधील थोपटवाडी येथील आरती कलवडे या सतरा वर्षीय तरुणीला विविस्त्र करुन तिची निघृण हत्या केल्याच्या घटनेनंतर आज विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी घटनास्थळी माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार महेश लांडगे, भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांच्यासमवेत भेट दिली. तसेच कलवडे यांच्या घरी जाऊन दरेकर यांनी कुटुबियांचे सांत्वन केले. 

या तरुणीच्या हत्या प्रकरणातील गुन्हेगार हे प्रस्थापित असून त्यांना राजकीय आश्रय असल्यामुळे आपल्या मुलीला न्याय मिळेल अशी आशा वाटत नसल्याची कैफियत कलवडे कुटुंबियांनी विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्याकडे मांडली. परंतु गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा विश्वास विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी कुटुंबियांना दिला. 

या प्रकरणात जलगदतीने तपास करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी  दरेकर यांनी केली आहे. याप्रसंगी पुणे जिल्हा भाजप अध्यक्ष गणेश भेगडे, खेड तालुका अध्यक्ष अतुल देशमुख, जिल्हा परिषद सदस्य भाऊ बुट्टे पाटील, पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर आदी उपस्थित होते. पनवेल,पुणे, सिंहगड कॉलेज,कोल्हापूर येथे झालेले बलात्कार व विनयभंगांच्या घटना तसेच नंदुरबार, इचलकरंजी, मालाड, देहू रोड या परिसरात महिला अत्याचार मोठ्या प्रमाणात झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून पोलिसांचा गुन्हेगारांवर आता वचक राहिलेला दिसत नाही, म्हणून अशा प्रवृत्ती निर्माण होत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी केला.  

विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांची भेट घेतली. यावेळी पोलिस उपायुक्त स्मिता पाटील उपस्थित होत्या. या दुदैर्वी घटनेतील गुन्हेगारांना कठोर शासन करण्याची मागणी विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी अप्पर पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News