कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नॅचरोपॅथीचा अवलंब करण्याचा स्वयंसेवी संघटनांचे आवाहन


कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नॅचरोपॅथीचा अवलंब करण्याचा स्वयंसेवी संघटनांचे आवाहन

वाफारा सत्याग्रहातून वाफ घेणे व उकडे ग्रीन मोदकचा आग्रह विडी कामगार नेते स्व.शंकर न्यालपेल्ली व ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड.भास्करराव आव्हाड यांना श्रध्दांजली अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या वतीने शनिवारी कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी उपाययोजना आणि उपचार पध्दती या विषयावर वेबीनार घेण्यात आले. या वेबीनारद्वारे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी नॅचरोपॅथीचा अवलंब करण्याचा संकल्प करण्यात आला. वाफारा सत्याग्रहाच्या माध्यमातून वाफ घेणे व उकडे ग्रीन मोदकचा आग्रह धरण्यात आला. तर या सुचना राज्य सरकारने कोरोनासाठी नेमलेल्या टास्क फोर्सला पाठविण्यात येणार आहेत. कार्यक्रमाच्या प्रारंभी विडी कामगार नेते स्व.शंकर न्यालपेल्ली व ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड.भास्करराव आव्हाड यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. तर निसर्गोपचार तज्ञ हेमा सेलोत यांच्या प्रमुख उपस्थितीत वेबीनार घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, अ‍ॅड. राजेंद्र सेलोत, अशोक सब्बन, कॉ.महेबुब सय्यद, जालिंदर बोरुडे, बापू चंदनशिवे, शाहीर कान्हू सुंबे आदी उपस्थित होते. वेबीनारद्वारे हेमा सेलोत यांनी नैसर्गिक पध्दतीने कोरोनाशी लढा देण्यासाठी विविध उपाय सांगितले. रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी कडीपत्ता, पुदीना, कोबीपत्ता यांची वाफ घेणे व उकडलेले ग्रीन मोदकच्या माध्यमातून पालेभाज्यांचा व औषधी गुणधर्म असलेल्या हिरवा रस पोटात जाण्यासंदर्भात रेसीपी सांगितली. तसेच कुटुंबाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या गृहिणींना कुटुंबभज्ञाक वॉरियर अन्नपुर्णा राष्ट्रीय मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमात वेबीनारच्या माध्यमातून अनेक नागरिक सहभागी होऊन त्यांनी देखील कोरोनावर उपचार पध्दती व संक्रमण रोखण्या संदर्भात मते मांडली. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News