राष्ट्रीय अंधत्व निवारण समितीच्या वतीने जालिंदर बोरुडे यांचा गौरव


राष्ट्रीय अंधत्व निवारण समितीच्या वतीने जालिंदर बोरुडे यांचा गौरव

नेत्रदान चळवळीत प्रभावीपणे कार्य केल्याचा सन्मान

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) राष्ट्रीय अंधत्व निवारण समिती नवी दिल्ली (साईट फॉर द साईटलेस) यांच्या वतीने अहमदनगर येथील नेत्रदूत ठरलेले जालिंदर बोरुडे यांचा गौरव करण्यात आला. राष्ट्रीय अंधत्व निवारण समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रेणू वाधवा यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र बोरुडे यांना प्रदान करण्यात आले आहे. 

फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून जालिंदर बोरुडे यांनी महाराष्ट्रात सर्वाधिक मोफत शिबीर घेऊन सर्वसामान्य गरजू रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची संधी उपलब्ध करुन दिली आहे. फाऊंडेशनने 22 वर्षाच्या कार्यकाळात 1 लाख 71 हजार गरजू रुग्णांना शिबीराच्या माध्यमातून मोफत मोतीबिंदूचे शस्त्रक्रिया घडवून आनल्या आहेत. तसेच नेत्रदान चळवळीत भरीव कार्य करुन, मरणोत्तर नेत्रदानातून 670 दृष्टीहीनांना नवदृष्टी मिळाली आहे. तर अनेक नागरिकांना मरणोत्तर नेत्रदान करण्यास प्रोत्साहित केले जात आहे. लॉकडाऊनकाळात देखील नियमांचे पालन करुन कोणत्याही प्रकाराची मदत न घेता फिनिक्स फाऊंडेशनने सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार वैद्यकिय सेवा शिबीराच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली आहे. अनेक गरजू रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली असून, निस्वार्थ भावनेने हे काम चालू असून, या कार्याची दखल घेत राष्ट्रीय अंधत्व निवारण समिती नवी दिल्ली यांच्या वतीने फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बोरुडे यांचा गौरव करण्यात आला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News