(वाळकी प्रतिनिधी विजय भालसिंग) निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या राज्य प्रसिध्दी प्रमुखपदी पै.नाना डोंगरे यांची नुकतीच नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा एकता फाऊंडेशन ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अतुल फलके यांनी डोंगरे यांना रोप देऊन सत्कार केला. यावेळी एकनाथ भुसारे, मयुर काळे, दत्ता डोंगरे, दिनेश भुसारे आदी उपस्थित होते.
अतुल फलके म्हणाले की, निमगाव वाघा या छोट्या गावात आपले सामाजिक कार्य उभे करुन नाना डोंगरे यांनी युवकांना एक प्रकारे प्रेरणा दिली आहे. त्यांचे पर्यावरण संवर्धनासाठी चालू असलेले कार्य प्रेरणादायी असून, सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या राज्य कमिटीवर त्यांची झालेली निवड गावाच्या दृष्टीने भुषणावह असल्याचे त्यांनी सांगितले. पै.नाना डोंगरे यांनी ग्रामीण भागात पर्यावरण संवर्धन व प्रदूषणमुक्तीसाठी कार्य चालू आहे. या चळवळीत सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले.