कोविड 19 साठी शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अर्थसहाय्य केले जात नाही, जनतने अफवांवर विश्वास ठेवू नये- मंगेश शिंदे


कोविड 19 साठी शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अर्थसहाय्य केले जात नाही, जनतने अफवांवर विश्वास ठेवू नये- मंगेश शिंदे

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी::-- कोरीना विषाणू ने जगभर थैमान घातले आहे,या विषयी व्हॉट्स ऍप गुरु,लेखक मोठ्या प्रमाणावर तयार झाले आहेत,सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवांना पेव फुटले आहे, कोरोना रोगच अस्तित्वात नाही,या रोगावर इलाज होईल,शासन आपल्याला खरे काहीच सांगत नाही असे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे मेसेज फिरत आहेत असाच प्रकार दौंड शहरात सुरू असल्याचे  नगरपालिका मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांनी सांगितले,त्यामुळे दौंड नगरपरिषद कार्यालय यांचे कडून दौंडकराना जाहीर आवाहन करण्यात आले आहे,की कोविड 19 या रोगावर उपचार  करण्यासाठी शासनाकडून दौंड नगरपरिषद येथे अर्थसहाय्य जमा होत असून दौंड नगरपरिषद त्याचे वाटप करीत असल्याचे मेसेज व्हायरल झाले आहेत त्यामुळे नगरपरिषद  मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांनी पत्रकाद्वारे दौंड जनतेला जाहीर आवाहन केले आहे, कोविड या रोगावर उपचार करण्यासाठी  अर्थसहाय्य  देण्यात येत नाही किंवा नगरपरिषद कार्यालय येथे कोणतेही अर्थसहाय्य जमा होत नाही याची सर्व दौंडकर नागरिकांनी नोंद घ्यावी असे कार्यालयाकडून पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News