स्वराज्य मंडळाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अरूण पठाडे यांचा सत्कार करण्यात


स्वराज्य मंडळाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अरूण पठाडे यांचा सत्कार करण्यात

शेवगाव सज्जाद पठाण (प्रतिनिधी)

शेवगाव प्राथमिक शिक्षक बॅंकेचे माजी संचालक विनोद फलके व शिक्षकनेते बाळकृष्ण कंठाळी यांच्या हस्ते करण्यात आला. स्वराज्य मंडळाच्या  तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अरूण पठाडे यांचा सत्कार प्राथमिक शिक्षक बॅंकेचे माजी संचालक विनोद फलके व शिक्षकनेते बाळकृष्ण कंठाळी यांच्या हस्ते करण्यात आला.

या वेळी स्वराज्य मंडळाचे जिल्हा कोषाध्यक्ष मच्छिंद्र भापकर व जिल्हा नेते भाऊसाहेब पाचरणे यांचाही सत्कार फलके,  कंठाळी व बाळासाहेब दातीर यांनी केला. नोव्हेंबर २००५ नंतर नोकरीत लागलेल्या प्राथमिक शिक्षकांसह इतर शासकिय कर्मचा-यांना सेवानिवृत्तीनंतर जुनी पेन्शन मिळावी या मागणीसाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेने गेल्या १० वर्षांपासून शासनाशी संघर्ष करण्याची भुमिका सातत्याने घेतली. त्यात काही अंशी यश मिळाले असले तरी अद्याप पुर्ण यश बाकी आहे.  जुनी पेन्शन हक्क संघटनेतील उत्साही व धडपड्या तरूण शिक्षक - शिक्षिकांनी पुढाकार घेत स्वराज्य मंडळ स्थापन केले ही बाब अतिशय चांगली आहे. प्राथमिक शिक्षक बॅंकेतही संचालक म्हणून तरूण नेतृत्वाला संधी मिळण्यासाठी माझा स्वराज्य मंडळास पाठिंबा आहे,  असे माजी संचालक विनोद फलके यांनी यावेली सांगीतलेः

जाहिरात
Search
विडिओ
Recent News