उत्तर विभागाचे प्रगतीसाठी सर्वांना विश्वासात घेवून निर्णय घेणार -आ.आशुतोष काळे


उत्तर विभागाचे प्रगतीसाठी सर्वांना विश्वासात घेवून निर्णय घेणार -आ.आशुतोष काळे

रयत शिक्षण संस्थेच्या व्हीडीओ कॉन्फरन्स मिटिंगमध्ये संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील यांच्याशी संवाद साधतांना रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग अध्यक्ष आमदार आशुतोष काळे.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

         कोळपेवाडी वार्ताहर – रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ज्याप्रमाणे माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष फुलविला तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाची जबाबदारी पार पाडतांना उत्तर विभागाचे प्रगतीसाठी सर्वांना विश्वास घेवून निर्णय घेणार असल्याची ग्वाही रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी नुकत्याच पार पडलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या व्हीडीओ कॉन्फरन्स मिटिंगमध्ये संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत दिली आहे.

            सर्व विभागीय अध्यक्ष, विभागीय अधिकारी,सहाय्यक विभागीय अधिकारी यांची सन २०२०/२१ मधील पहिली ऑनलाईन बैठक संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत बोलतांना रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी संस्थेत स्थानिक परिस्थितीत येणाऱ्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी सर्वांसोबत विचारविनिमय करूनच या अडचणी सोडवू. शाळेच्या प्रवेशाबाबत शासनाचे व संस्थेच्या धोरणानुसार कार्यवाही करू.शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, अर्धवेळ (तासिका)सेवक तसेच वसतिगृहाच्या असलेल्या अडचणी मार्गी लावू.अटल टिकरिंग लॅब व्यवस्थाचे नीती आयोग भारत सरकार यांचे मार्फत ५५ शाखांना अनुदान मंजूर असून त्यापैकी २५ शाखांना ते मिळालेले असून उर्वरीत ३० शाखांना अनुदान मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी या बैठकीत सांगितले.शाळा मान्यतेचे प्रस्तावामध्ये ३ मराठी माध्यम,४ इंग्रजी माध्यमांचे मान्यतेसाठी शासनस्तरावर प्रयत्न करू. संस्थेकडून वेळोवेळी येणाऱ्या सूचनांनुसार विभागाचे कामकाज करून संस्थेच्या उत्तर विभागाची दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणार असल्याचे उत्तर विभाग अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.


    

जाहिरात
Search
विडिओ
Recent News