आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागाच्या विकासाचा प्रश्न मार्गी -सभापती सौ.पोर्णिमा जगधने


आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागाच्या विकासाचा प्रश्न मार्गी -सभापती सौ.पोर्णिमा जगधने

खोपडी ग्रामपंचायत नूतन इमारत कामाचे भूमिपूजन करतांना सभापती पोर्णिमा जगधने,सदस्य मधुकर टेके,जिनिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार,राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष चारुदत्त सिनगर आदी.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

             कोळपेवाडी वार्ताहर –  जिल्हा परिषद पंचायत समितीचे सत्ता परिवर्तन झाल्यापासून कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागाच्या रखडलेल्या विकास कामांना वेग येवून अनेक कामे आज प्रगतीपथावर आहेत. यामध्ये आमदार आशुतोष काळे यांचे योगदान असून त्यांच्या अथक प्र्यत्नानामुळे जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होवून ग्रामीण भागाच्या विकासाचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे सभापती सौ. पोर्णिमा जगधने यांनी म्हटले आहे.

           खोपडी येथे आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसुविधा योजने अंतर्गत खोपडी ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनालीताई साबळे यांच्या निधीतून जनसुविधा योजनेअंतर्गत खोपडी ग्रामपंचायत नूतन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन सभापती सौ.पौर्णिमाताई जगधने यांच्या शुभहस्ते पार पडले.याप्रसंगी त्या बोलत होत्या.त्या पुढे म्हणाल्या की, ग्रामीण भागाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांचे मार्गदर्शनातून सर्वच जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांना विकासकामे करतांना प्रेरणा मिळत असल्यामुळे ग्रामीण भागात सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विकास पोहोचला असल्याचे सभापती सौ.पोर्णिमा जगधने यांनी म्हटले आहे.यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनालीताई साबळे,पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, आदिनाथ वारकर,बाळासाहेब जाधव,बाळासाहेब वारकर, उपसरपंच शिवाजी वारकर, संतोष ठुबे,बाबासाहेब जाधव, रोहिदास जाधव,प्रमोद रायते आदी उपस्थित होते.जाहिरात
Search
विडिओ
Recent News