येरवडा कारागृहातुन पळालेला फरारी आरोपी दौंड तालुक्यातला अटल गुन्हेगार श्रीगोंदा पोलिसांनी सापळा लावून केला जेरबंद


येरवडा कारागृहातुन  पळालेला फरारी आरोपी दौंड तालुक्यातला अटल गुन्हेगार श्रीगोंदा पोलिसांनी सापळा लावून केला जेरबंद

श्रीगोंदा अंकुश तुपे प्रतिनिधी : खून,दरोडा,जबरी चोरी,मोक्का,अश्या विविध ९ गंभीर गुन्ह्यांची दौंड व
यवत पोलीस स्टेशनला नोंद असलेला खतरनाक गुन्हेगार देवगण अजिनाथ चव्हाण रा. बोरावकेनगर दौंड जि. पुणे हा दि १६ जुलैला पहाटे येरवडा कारागृहातून पळाला होता.त्याच्यासोबत अजून चार आरोपींनी देखील कारागृहातून पलायन केले होते.
         यातील आरोपी देवगण चव्हाण याने आपली ओळख लपवण्यासाठी वेषांतर करून केस,दाढी काढून टाकली होती.हा आरोपी हा राक्षसवाडी ता. कर्जत शिवारात असल्याची खबर श्रीगोंदा पोलिसांना मिळाली होती.पोलिसांनी शुक्रवारी दि२४ रोजी पहाटेच्या सुमारास  वेषांतर करून राक्षसवाडी शिवारातील लोहकरा नदीच्या पुलाखाली आरोपी लपून बसलेला दिसला.पोलिसांना पाहताच तो पळू लागला. पोलिसांनी  फिल्मी स्टाईलने चार ते पाच किलोमीटर पाठलाग करून आरोपीला जेरबंद केले.
        ही कारवाई पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, मुख्य पोलिस हवालदार अंकुश ढवळे,प्रकाश मांडगे व पुणे स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन कर्मचाऱ्यांनी केली.आरोपीला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले
      पुणे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी श्रीगोंदा पोलीस पथकाचे अभिनंदन केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News