नागपंचमीला वारुळाची पूजा करुन महिलांनी केले वृक्षरोपण


नागपंचमीला वारुळाची पूजा करुन महिलांनी केले वृक्षरोपण

वाळकी (प्रतिनिधी विजय भालसिंग) निमगाव वाघा (ता. नगर) येथे नागपंचमी सणानिमित्त शिवारातच वारुळाची पूजा करुन महिलांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गावात प्रत्येकाने घरोघरी आणि शिवारात साध्या पध्दतीने नागपंचमी साजरी केली. डोंगरे वस्ती येथील शिवारात करण्यात आलेल्या वृक्षरोपण अभियानाप्रसंगी कांचन डोंगरे, राधिका डोंगरे, तेजस्विनी डोंगरे, मंदाताई डोंगरे उपस्थित होत्या. प्रारंभी महिलांनी वारुळाची पूजा केली.

डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा निसर्ग व पर्यावरण मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष पै.नाना डोंगरे म्हणाले की, वृक्षरोपण व संवर्धन लोकचळवळ होण्यासाठी सण, जयंती व उत्सवाच्या माध्यमातून रोपांची लागवड होणे आवश्यक आहे. वाढते शहरीकरण व औद्योगिकरणामुळे झाडांची कत्तल झाल्याने मनुष्यापुढे नैसर्गिक संकट उभे ठाकले आहे. निसर्गाची सेवा ही ईश्‍वर सेवा, ही भावना प्रत्येकाच्या मनात जागृक होण्याची गरज आहे. वृक्षरोपण व संवर्धनाने पर्यावरणाचा समतोल साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योजक रामदास डोंगरे यांनी या नागपंचमी आगळ्या-वेगळ्या पध्दतीने साजरी केल्याबद्दल सामाजिक संस्थेचे कौतुक करुन ग्रामस्थांना वृक्षरोपणाचे आवाहन केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News