राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना कोरोनाची लागण


राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्या पत्नीसही कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ते पुण्यात आहेत. त्यांची प्रकृती व्यवस्थित असून ते पुण्यातच उपचार घेणार आहेत.            इंदापूर काकासाहेब मांडरे (प्रतिनिधी)

कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात गावोगावी मदतवाटपासह विविध ठिकाणी भेटी देण्यात गारटकर यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. तसेच कोरोनाच्या काळातही संघटनेतील पदाधिकाऱ्यांना परिसरातील रोजगार नसलेल्या, गरीब व गरजू लोकांच्या मदतीसाठी त्यांनी आवाहन करण्यासाठी पुढाकार घेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवला होता. इंदापूर तालुक्यातही राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यासह पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांनी सातत्याने तालुक्याचा दौरा करीत लोकांना मदत करण्यात पुढाकार घेतला होता. त्याचबरोबर ते जिल्हाभर फिरून पदाधिकाऱ्यांशी संपर्क ठेवत सामान्यांच्या मदतीसाठी आवाहन करीत होते.

दोन दिवसांपूर्वी त्यांना ताप आल्यानंतर त्यांनी स्वतःहून पुण्यात तपासणी केली. त्यामध्ये त्यांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नीचीही तपासणी केली. त्यात त्याही पॉझिटिव्ह आल्या आहेत. सध्या दोघेही क्वारंटाईन असून पुण्यातील खासगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार होणार आहेत.

स्वतः गारटकर यांनी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट केले. गारटकर हे गेली अनेक वर्षे कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यात सातत्याने अग्रेसर राहीलेले आहेत. त्यामुळेच त्यांनी सेल्फ क्वारंटाईन होतानाच सर्वप्रथम आपल्या संपर्कात नजिकच्या दिवसात आलेल्या कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या प्रदेश पातळीवरील युवा नेत्यास बारामती तालुक्यात कोरोनाची लागण झाली आहे. राष्ट्रवादीकडून तळागाळापर्यंत सुरू असलेल्या मदतकार्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांपासून नेतेमंडळी स्वतःही सहभागी असल्याने कोरोनाची लागण त्यांना होत असल्याने कार्यकर्ते काळजीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News