संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव - देशात खाजगीकरणाला सुरूवात झालीतेव्हा पासून प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली. याची शैक्षणिक क्षेत्राला लागण झाली. हळूहळू हळूहळू इंग्रजी माध्यमाच्या शाळेला सुगीचे दिवस येत गेले.शासनाने अनेक इंग्रजी माध्यमांचा शाळेला परवानग्या दिल्या त्यामुळे इग्रंजी माध्यमांच्या शाळा गाव तेथे झाल्या.त्यामुळे मराठी शाळेत पालक आपल्या पाल्यांचा प्रवेश न घेता इंग्रजी माध्यमांचा शाळेत प्रवेश करत आहे.
शासनाने शासनाच्या मराठी शाळेत इंग्रजी माध्यमातून शिक्षण चालु केल्यास लाखो गरीब नागरिकांना चा तसेच विद्यार्थीना त्याचा फायदा होईल.यासंदर्भात देशभक्ती सेवा मंचचे अध्यक्ष रवींद्र जगताप यांनी नुकतेच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन दिले आहे..