पुणे जिल्हा परीषदेतील चार कर्मचाऱ्यांना पदोन्नती: आयुष प्रसाद मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. पुणे


पुणे जिल्हा परीषदेतील चार कर्मचाऱ्यांना पदोन्नती: आयुष प्रसाद मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. पुणे

भिगवण नानासाहेब माकड (प्रतिनिधी)

पुणे जिल्ह्यात कोरोना सारख्या महाभयंकर साथीच्या काळातही प्रशासनाने लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांची दखल घेऊन कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदी पदोन्नती दिल्यामुळे संघटनेकडुन समाधान व्यक्त केले

           जिल्हा परीषदेच्या व्यस्त कामातून पुणे जिल्हा परीषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी  लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेच्या मागणीनुसार पुणे जिल्हा परिषद अंतर्गत शासन निर्णया नुसार   वरिष्ठ सहाय्यक या  पदावर कार्यरत असणारे श्रीम संगिता मोदी, अनिल मोरे, अशोक फलफले व शशीकांत  शिंदे या चार  कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतानुसार कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदावर पदोन्नती करण्यात आली.याबद्दल संघटनेच्या वतीने मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व उपमुख्यकार्यकारी अधिकारी महादेव घुले यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेखर गायकवाड यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आश्वासित प्रगती योजनेतील दहा,वीस,तीस चे प्रस्ताव लवकरच मंजूर करण्यात येनार असल्याचे सांगितले. यावेळी लिपीक संघटनेचे अध्यक्ष श्री. शेखर गायकवाड, उमाकांत सुर्यवंशी, नरेंद्र मोहीते, किशोर कुलकर्णी, सुहास संचेती,विनय पुरोहित,मनोहर वन्नम,विकास पापळ सुरेंद्र सौदागर व प्रकाश येनगुल उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News