विवाहित प्रियाकराने फसविल्याने नैराश्यातुने 20 वर्षीय तरूणीनी गळफास घेऊन आत्महत्या


विवाहित प्रियाकराने फसविल्याने नैराश्यातुने 20 वर्षीय तरूणीनी गळफास घेऊन आत्महत्या

श्रीगोंदा अंकुश तुपे (प्रतिनिधी)

श्रीगोंदा:-विवाहित प्रियकराने फसवल्याने 20 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय कर्मचारी वसाहतीत घडली 

मयत तरुणीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विवाहित प्रियकर धनंजय कंबळे राहणार लोहारे उस्मानाबाद सह त्याचा ग्रामीण रुग्णालयात काम करणारा भाऊ विजय व भावजय विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की

मयत तरुणी अकलूज येथील रहिवासी असून श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात काम करणाऱ्या नातेवाईकांकडे राहत होती तर धनंजय हा भाऊ विजय कडे  आला होता या दोघांची ओळख झाली पुढे ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले लग्नाचे आमीष दाखवून शरीरसंबंध ठेवले मात्र तिला प्रियकर विवाहित असल्याचे उशिरा कळले यातून वाद झाला मयत तरुणीने नातेवाईकांना घडला प्रकार व फसवणुक झाल्याचे सांगितले नातेवाईकांनी धनंजयचा भाऊ व भावजयीला विचारले असता त्या दोघांनी तरुणीलाच दोषी धरल्याने नैराश्यातुन अखेर तिने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.

गळफास घेतल्यावर तातडीने खाजगी दवाखान्यात दाखल करण्यातआले मात्र शनिवारी पहाटे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप अधिक तपास करत आहेत

जाहिरात
Search
विडिओ
Recent News