लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना "भारतरत्न" पुरस्कार देण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करावा –आमदार आशुतोष काळे


लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना "भारतरत्न" पुरस्कार देण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करावा –आमदार आशुतोष काळे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

           कोळपेवाडी वार्ताहर - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना "भारतरत्न" पुरस्कार देण्यात यावा यासाठी केंद्र शासनाकडे तातडीने प्रस्ताव सादर करावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे दिलेल्या पत्रात केली आहे.

           मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात आमदार आशुतोष काळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, संयुक्त महाराष्ट्राच्या जडणघडणीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा सिंहाचा वाटा आहे.साहित्य क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अजोड असून त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या तब्बल ३६ भाषेत अनुवादित केल्या गेल्या आहेत.कामगार चळवळीत देखील त्यांचा नेहमीच सहभाग राहिला असून कामगारांच्या न्याय हक्कासाठी ते नेहमी सर्वात पुढे होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना "भारतरत्न" पुरस्कार मिळावा अशी अनेक वर्षापासून सर्वच समाज बांधवांची मागणी आहे. १ ऑगस्ट २०२० रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची फक्त जयंतीच नसून त्यांचे जन्म शताब्दी वर्ष आहे. जर त्यांना यावर्षी पुरस्कार दिला गेला तर तीच त्यांना खरीखुरी श्रद्धांजली राहणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे. त्यामुळे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेल्या अनमोल कार्याची दखल घेऊन १ ऑगस्ट २०२० रोजी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना "भारतरत्न" पुरस्कार देण्यात यावा यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे तातडीने प्रस्ताव सादर करावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे.आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या मागणी बद्दल क्रांतीगुरु सोशल फौंडेशन महाराष्ट्र राज्य,क्रांतिवीर लहूजी टायगर सेना महाराष्ट्र राज्य,मातंग युवा संघटना कोपरगाव,भारतीय लहूजी सेना, राष्ट्रीय लहूजी सेना,स्वाभिमानी रिपब्लिकन तथा युथ रिपब्लिकन, विराट सामाजिक प्रतिष्ठान शिर्डी, प्रदेशाध्यक्ष लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र राज्य,लहूजी शक्ती संघटना आदी संघटनांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News