कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वरवंड प्रतिबंधित क्षेत्र घोषीत


कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वरवंड प्रतिबंधित क्षेत्र घोषीत

वरवंड(प्रतिनिधी):-दौंड तालुक्यातील वरवंड गावच्या हद्दीमध्ये एक कोरोना विषाणू संक्रमित रुग्ण आढळला असुन; कोरोना संक्रमित रुग्ण काही लोकांच्या संपर्कात आला होता.तसेच या व्यक्तीने इतरत्र ठिकाणी प्रवास केल्यामुळे कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग व प्रादुर्भाव होऊ नये;तसेच त्याला नियंत्रणात आणण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी;पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८८७ नुसार;दौंड/पुरंदरचे उपविभागीय दंडाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्या आदेशाने दिनांक २१ जुलै पासुन पुढील १४ दिवसांसाठी वरवंड आणि संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

     या काळात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना  करण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन समिती वरवंड यांच्या वतीने;दिनांक २४ जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या प्रतिबंधित काळात अत्यावश्यक सेवा देणारी दूध विक्री,फळ,भाजीपाला विक्री,किराणा दुकान,पीठ गिरणी,मिरची कांडप केंद्र;फिल्टर पाणी वाटप केंद्र सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत पर्यतच चालू राहण्याबरोबर तसेच इतर सर्व दुकाने बंद राहतील;नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर येऊ नये,घराबाहेर येताना तोंडाला मास्क बांधणे बंधनकारक आहे;गावातील कोणाकडे कामानिमित्त अथवा इतर काही कारणास्तव दुसऱ्या गावातील आलेल्या व्यक्तीची माहिती संबधितांनी ग्रामपंचायत व आरोग्य विभागास देणे बंधनकारक आहे.

     अशी माहिती न दिल्यास बाहेरील आलेल्या व्यक्तीस कोरोना आजार असल्याचे;निष्पन्न झाल्याचे तपासणीत आढळून आल्यास संबधीत ग्रामस्थास १० हजार रुपयांचा दंड आकरण्यात येणार आहे.तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व भारतीय साथ अधिनियम १८९७च्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केला जाईल.याची ग्रामस्थांनी नोंद घ्यावी.असे आपत्ती व्यवस्थापन समितीने झालेल्या बैठकीत सांगितले आहे.या प्रतिबंधित क्षेत्रासाठी  यावेळी पोलीस पाटील किशोर दिवेकर,तंटामुक्ती अध्यक्ष रोहिदास रणधीर,ग्रामसेवक नानासो काळाणे,व सरपंच गोरख दिवेकर उपस्थित होते.

         वरवंडला मोठी बाजारपेठ नसल्यामुळे रोज तेच ग्राहक आणि तेच दुकानदार यावरचं दुकानदारांचा उदरनिर्वाह चालतो.मात्र लॉकडाऊनची मोठी झळ व्यावसायिकांना बसत आहे.यामुळे काहींना व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे.तसेच भाडेतत्वावर दुकाने घेऊन सुरु केलेला व्यवसाय या काळात पूर्ण विस्कटला आहे.यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा असा प्रश्न भेडसावत आहे.तसेच दुकान मालकांनी याचा विचार करून या व्यवसायिकांचे चार महिन्याचे भाडे माफ करावे.यामुळे व्यवसायिकांना दिलासा मिळणार आहे. 

                    बापू बारवकर

दौंड विधानसभा काँग्रेस तालुका उपाध्यक्ष 


जाहिरात
Search
विडिओ
Recent News