पणदरे येथे विक्रम कोकरे यांचे विविध मागण्यांसाठी पाच दिवसांपासून उपोषण सुरू


पणदरे येथे विक्रम कोकरे यांचे विविध मागण्यांसाठी पाच दिवसांपासून उपोषण सुरू

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे) बारामती तालुक्यातील गिताई माता मंदिर पणदरे याठिकाणी सामाजिक कार्यकर्ते विक्रम कोकरे यांनी येथील ग्रामपंचायत संबंधातील व इतर काही मुद्दे घेऊन उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून अजूनही त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. 

 पणदरे येथील निलंबित ग्रामविकास अधिकारी शासन निर्णयाचे उल्लंघन करून चुकीच्या पद्धतीने ज्या तालुक्यात निलंबित केले त्याच तालुक्यात पुन:स्थापित केल्याबद्दल शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करावी. पणदरे ग्रामपंचायतच्या टेक्निकल अर्थ व वित्त सह संपूर्ण विभागांची सखोल चौकशी व्हावी. चौकशी अधिकारी,  विस्ताराधिकारी व इ. नियुक्ती व्हावी. अशा काही मागण्या कोकरे यांच्या आहेत.

 जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नाही असे विक्रम कोकरे यांनी यावेळी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News