भिगवण येथे ४ गावठी पिस्तूल व ८ जिवंत काडतुसा सह सराईत गुन्हेगाराना ताब्यात


भिगवण येथे ४ गावठी पिस्तूल व ८ जिवंत काडतुसा सह सराईत गुन्हेगाराना ताब्यात

भिगवण(प्रतिनिधी) नानासाहेब मारकड 

भिगवण येथे ४ गावठी पिस्तूल व ८ जिवंत काडतुसा सह सराईत गुन्हेगाराना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती भिगवण पोलिस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिली.भिगवण पोलीस सुत्रानी दिलेल्या माहितीनुसार पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथक व भिगवण पोलिस स्टेशन यांची मोठी कारवाई  पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे आपल्या पथकासह भिगवण परिसरात गस्त करत असताना दहशतवाद विरोधी पथकाचे  महेंद्र कोरवी  यांना भिगवण स्टँड परिसरामध्ये तीन इसम गावठी पिस्तूल घेऊन येणार आहेत अशी बातमी मिळाली होती मिळालेल्या गोपनीय बातमीवरून पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने भिगवण पोलिसांच्या मदतीने तीन इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार गावठी पिस्तूल व आठ जिवंत काढतुस ताब्यात घेतले आहेत. सदर इसमांवर बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी भिगवण पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई  पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती श्री नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा, भिगवण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली  पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक फौजदार सुनील ढगारे, राजू पवार, रज्जाक शेख, जितेंद्र शेवाळे, विश्वास खरात, पोलीस हवालदार राजेंद्र मिरगे, ईश्वर जाधव, विशाल  भोरडे, किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी, लक्ष्मण राऊत, मोसिन शेख,अरुण पवार तसेच पोलीस नाईक गोरख पवार व इकबाल पठाण या भिगवन पोलीस स्टाफ पथकाने केली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News