विश्व हिंदू परिषदेतर्फे नगर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्राच्या मातीचे पूजन करून अयोध्येतील श्री राम मंदिरासाठी रवाना


विश्व हिंदू परिषदेतर्फे नगर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्राच्या मातीचे पूजन करून अयोध्येतील श्री राम मंदिरासाठी रवाना

दिल्लीगेट येथील विश्व हिंदू परिषदेतर्फे तीर्थक्षेत्राच्या मातीचे विधिवत पूजन ह.भ.प.रामदास महाराज क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष अँड.जय भोसले, जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे, मठमंदिर संपर्क समितीचे जिल्हा प्रमुख हरिभाऊ डोळसे,पत्रकार राजेश सटाणकर,बजरंग दलाचे सहसंयोजक भरत थोरात आदी.(छाया-अमोल भांबरकर) 

नगर -(प्रतिनिधी संजय सावंत) दिल्लीगेट येथील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयासमोर नगर जिल्ह्यातील क्षेत्र मोहटा देवी,क्षेत्र मढी देवस्थान,वृद्धेश्वर देवस्थान,क्षेत्र डोंगरगण,गोरक्षनाथ गड,श्रीगोंदा-मांडवगण,कर्जत-गोदड महाराज ,जामखेड-रामेश्वर,नागेश्वर,पारनेर-करंजुले हर्या,शेवगाव-वरुर आदी ठिकाणाहून तीर्थक्षेत्राच्या माती आणून त्या मातीचे विधिवत पूजन ह.भ.प.रामदास महाराज क्षीरसागर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.'जय श्री राम' या मंत्राच्या जय घोशाने श्री राम अभिषेक करण्यात आला.याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष अँड.जय भोसले, जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे,मठमंदिर संपर्क समितीचे जिल्हा प्रमुख हरिभाऊ डोळसे,पत्रकार राजेश सटाणकर,बजरंग दलाचे सहसंयोजक भरत थोरात आदी उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी अँड सचिन बडे,अँड सतीश शेळके,अँड मारुती कदम, अँड काकासाहेब कोठुळे आदींचे सहकार्य लाभले. ५ ऑगस्ट रोजी अयोध्या येथे होणाऱ्या श्री राम मंदिराच्या भूमी पूजन सोहळ्यासाठी विश्व हिंदू परिषदे तर्फे नगर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्राच्या मातीचे पूजन करून पाठविण्यात आली.या कार्यक्रमासाठी विश्व हिंदू परिषद,बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.                              


जाहिरात
Search
विडिओ
Recent News