प.पु.स्वामी वासुदेवनंदगिरी उर्फ बहुरूपी महाराज यांनी माणुसकी हाच खरा धर्म आहे हि शिकवण दिली.


प.पु.स्वामी वासुदेवनंदगिरी उर्फ बहुरूपी महाराज यांनी माणुसकी हाच खरा धर्म आहे हि शिकवण दिली.

वाळकी विजय भालसिंग प्रतिनिधी-

अनाथांचे कैवारी व जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष प.पु.स्वामी वासुदेवनंदगिरी उर्फ बहुरूपी महाराज यांचे नगर तालुक्यासह सम्पूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भक्तगण आहेत.आज महाराजांचे वय १०० वर्ष असूनही ते अनाथ बालकांसाठी कीर्तन प्रचन करतात.त्यान्च्यारूपाने मी देव पहिला आहे.माणुसकी हाच खरा धर्म आहे हि शिकवण मला महाराजांकडून मिळाली.त्यांनी आतापर्यंत ७२ मुलींचे विवाह लावलेले असून कुठल्याही प्रकारचे शासकीय अनुदान नसतानाही नाशिक जिल्ह्यातील लासलगाव या ठिकाणी जय जनार्दन स्वामी अनाथ सुरु केला असून या छोट्याशा अनाथ आश्रमाचे रूपांतर वटवृक्षात झाले आहे.अनाथ बालकांचे आधारवड आहेत.                         

                   सुरुवातीला छोटेसे पाल ठोकून महाराजांनी अनाथ आश्रमाची स्थापना केली.पोटाला चिमटा घेऊन महाराजांनी अनाथ मुलांच्या भोजनाची व्यवस्था केली.प्रसंगी उपवास केले.पहाटे लवकर उठून विधिवत पूजा पाठ करून महाराज बगलेत झोळी घेऊन मिळेल त्या ठिकाणी कीर्तने प्रवचन करून कुणालाही आग्रह न करता 'देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी' हाच संकल्प मनी बाळगून अनाथ निराधार बालकांची सेवा करतात. महाराजांना या कामात जी मोलाची साथ लाभली ती आश्रमाचे सचिव दिलीप गुंजाळ यांची आश्रम चालवणे एवढे सोपे काम नाही.त्यासाठी दिलीप गुंजाळ यांच्या धर्म पत्नी सौ संगीता गुंजाळ यांची मोलाची साथ मिळाल्याने आज अनाथ मुलांच्या राहण्यासाठी तीन मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून या आश्रमात शेकडोच्या वर बालके असून लॉकडाऊनच्या काळातही या निराधार बालकांना कशाचीही उणीव भासत नाही.गुण्यागोविंदाने हि बालके राहतात अश्या या अनाथांचे माता-पिता प.पु.स्वामी वासुदेवनंदगिरी उर्फ बहुरूपी महाराज,आश्रमाचे सचिव दिलीप गुंजाळ व धर्म पत्नी सौ संगीता गुंजाळ तसेच अवधूत साखरे महाराज यांचे योगदान अमूल्य आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News