तीन वर्षाच्या बाळापासून ते 70 वर्षा पर्यंतचे व्यक्ती सह दौंड शहरात 11 जण कोरोना बाधीत,जनतेने या रोगाला थोडेसे गांभीर्याने घ्यावे -- डॉ संग्राम डांगे


तीन वर्षाच्या बाळापासून ते 70 वर्षा पर्यंतचे व्यक्ती सह दौंड शहरात 11 जण कोरोना बाधीत,जनतेने या रोगाला थोडेसे  गांभीर्याने घ्यावे -- डॉ संग्राम डांगे

विठ्ठल होले पुणे

  दौंड प्रतिनिधी::-- दौंड शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून अनिश्चित काळासाठी जाहीर झाले आहे, परंतू शहरात कोणत्याही प्रकारचे शासनाचे पाळले जात नाहीत ही बाब दौंडकर नागरिकांसाठी चिंतेची आहे,उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डॉ संग्राम डांगे यांनी या अगोदरच सांगितले आहे कोविड सेंटर फुल झाले असून सध्या ज्या लोकांच्या घरी सर्व सुविधा असतील अशा लोकांना त्यांच्या घरीच अलगीकरण  करण्यात आले आहे आणि जागेवरच उपचार सुरू आहेत,तरी दौंडकर जनतेने या रोगाला हलक्यात घेऊ नये,काळजी घेतली तरच आपण दौंड शहरात या रोगावर नियंत्रण आणू शकतो,24 जुलै रोजी 55 लोकांचे स्वाब घेतले होते त्यापैकी 44 जण निगेटिव्ह आले आहेत तर 11 जणांचा अहवाल पोझीटीव आला असल्याचे डॉ संग्राम डांगे यांनी सांगितले आहे,11 मध्ये 9 पुरुष आणि 2 महिला आहेत,तीन वर्षाचे बाळ आज कोरोनाचे शिकार झाले आहे,यामध्ये प्रामुख्याने शालिमार चौक 1,स्वप्न दीप अपार्टमेंट 1,शिवराज नगर 2,फादर हायस्कूल 2, स्टेट बँक 2,कुंभार गल्ली 1,खाटीक गल्ली 1, लिंगाळी 1 असे 11 लोक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News