महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने वेस येथे मका शेतीशाळा संपन्न!!


महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने वेस येथे मका शेतीशाळा संपन्न!!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी :

वेस -महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने क्रोपसप योजनेअंतर्गत या खरीप हंगामात शेतकऱ्यांमध्ये की ड्रॉप खत, पाणी व्यवस्थापन,आदी विषयांच्या अडचणी सोडविण्याच्या उद्देशाने मा. कोपरगाव तालुका कृषीअधिकारी अशोकराव आढाव साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मका पिकाची शेतीशाळा वेस या गावी संपन्न झाली.

 या शेती शाळेमध्ये प्रामुख्याने माननीय सरपंचअशोकराव म्हाळसकर सुरेश पाडेकर हौशीराम पाडेकर राजेंद्र कोल्हे भडांगे सर अरुण कोल्हे कृषी सहाय्यक अनिरुद्ध घुगेआदी मान्यवर उपस्थित होते प्रत्येक पंधरवड्यात मंडळ कृषी अधिकारी दिलीपराव भोसले साहेब कृषी पर्यवेक्षक संजय धनकुटे साहेब आदींचे मार्गदर्शन लाभत आहे.

आजच्या शेतीशाळा वर्गामध्ये मका पिकाचे खत व्यवस्थापन निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी साठी निंबोळी अर्काचा वापर तसेच विद्राव्य खतांचा वापर मका पिकामध्ये आंतरमशागत करताना सायकल च्या माध्यमातून केले जाणारे आंतरमशागत तसेच सापळा पिके धने ज्वारी त्याच्या लागवडीचे महत्व इत्यादी विषयावर सविस्तर मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी अशोकराव आढाव साहेब यांनी केले यावेळी शेतीशाळा प्रशिक्षक निलेश बिबवे यांनी मका पीक निरक्षणे पिकाबरोबरच सध्या शेतकरी प्रमुख समस्या असलेल्या सोयाबीनच्या पिवळेपणा घालवण्यासाठी सूक्ष्म मूलद्रव्य विद्राव्य खताची फवारणी आधी विषयावर माहिती दिली.

                     तसेच महाराष्ट्रभूमि मराठी न्युज च्या वतीने चालवण्यात येणाऱ्या शेतीशाळा सदरा बद्दल शेतकरी बंधूंना माहिती देण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनीटायझरचा वापर करून शेतीशाळा घेण्यात आली या शेती शाळेस शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला शेवटी कृषी सहाय्यक अनिरुद्ध घुगे साहेब यांनी उपस्थित शेतक-यांचे आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News