श्रीगोंदा | कृषी उत्पन्न बाजार समिती ची मासिक सभा सपन्न


श्रीगोंदा | कृषी उत्पन्न बाजार समिती ची मासिक सभा सपन्न

आज दिनांक 24 जुलै 2020 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती ची मासिक सभा आयोजित केली होती या सभेबेबत अनेक प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते मात्र सभा सुरळीत पार पडली.   

श्रीगोंदा प्रतिनिधी अंकुश तुपे

या सभेमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती चे सचिव दिलीप डेबरे यांचे निलंबन करण्यात आले, हा ठराव 17 विरुद्ध 0 मतांनी मंजूर करण्यात आला त्याचबरोबर ईतर महत्वच्या विषयांची  चर्चा झाली तसेच काही संचालक व कर्मचारी यांच्या नावावर आलेल्या कांदा अनुदानाची माहिती संचालक बाळासाहेब नाहाटा यांनी मागवली तसेच या अनुदानाच्या बाबतीत फार मोठा गैरकारभार झाला असून त्याची वरिष्ठांकडून चौकशी करणार असल्याचे नाहटा यांनी सांगितले.

तसेच उपसचिव संपत शिर्के यांकडे  प्रभारी सचिव पदाचा कार्यभार देण्यात आला उपसभापती वैभव पाचपुते यांनी हातावरील शिल्लक रकमेचा विषय मांडला त्याबाबत त्यांनी माजी सभापती नाहाटा आक्षेप घेतला त्यावर सहाय्यक उप निबंधक रावसाहेब खेडकर यांनी सुरेश वाळुंज (शासकीय लेखापाल) यांना पुढील बैठकीत आमंत्रित करण्याचे आदेश केले.

तसेच श्रीराम ऍग्रो यांना दिलेला भूखंड  व विठ्ठलराव कापसे वाचनालय यांना बेकायदेशीर पणे दिलेले शेतकरी निवास परत घेणे  तसेच काष्टी उपबाजार समिती मधील गाळा विक्री रद्द करण्याचेही या सभेमध्ये ठरले.

1) कृषी उत्पन्न बाजार समिती मधील 

कारभाराचे शुद्धीकरण करण्याची गरज आहे त्यामुळे आज डेबरे यांवर कारवाई करण्यात आली पुढील कारवाई बहुमताने वैभव पाचपुते यांवर होईल. मीच शेतकऱ्यांचा कैवारी आहे व ईतर संचालक सहकार्य करत नाहीत हे चुकीचे असून असे संगणाऱ्यांचे खरे रूप जनतेसमोर उघडे करू असा इशारा ना हाटा यांनी दिला.

या सभेला धनसिंग भोईटे, वैभव पाचपुते, संजय जामदार,मीनाताई आढाव, रावसाहेब खेडकर,लक्ष्मण नलगे, सतीश पोखरणा,उमेश पोटे,संजय महाडुळे,शैला काटे, उर्मिला गिरमकर, ई. संचालक उपस्तीत होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News