अहमदनगर( प्रतिनिधी संजय सावंत :) ट्रासपोर्ट टेम्पोवरील चालकाकडे पुणे येथून माल आणण्यासाठी मालकाने दिलेले एक लाख 97 हजार रूपये लुटले असल्याची फिर्याद देण्यासाठी कोतवाली पोलिसांकडे गेलेल्या चालकाचा बनाव पोलिसांनी पाच तासात उघड केला. या लुटीच्या बनावात टेम्पो चालकासह त्याला मदत करणारे दोघांना पोलिसांनी अटक केली. एका अल्पवयीन बालकास ताब्यात घेतले आहे.
टेम्पो चालक प्रदीप सोन्याबापू शिरसाठ (रा. गंगादेवी ता. आष्टी जि. बीड), साहील जामदार शेख (रा. बोल्हेगाव, नगर), प्रकाश चंद्रकांत भाकरे (रा. नागापूर) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. याप्रकरणी ट्रासपोर्ट व्यवसायिक शरद दशरथ रोडे (वय- 34 रा. नागापूर) यांनी फिर्याद दिली होती.
या गुन्ह्याचा तपास शहर उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, सहायक निरीक्षक नितीन रणदिवे, उपनिरीक्षक सतीष शिरसाठ व त्यांच्या पथकातील कर्मचारी पो ना प्रमोद लहारे. शाहीद शेख. बापूसाहेब गोरे. सुजय हिवाळे. मोहन भेटे.. टिपरे. भारत इंगळे. यांनी ही कारवाई केली.