देवदैठण व पेडगाव मंडळात ५५ मि. मि पेक्षा जास्त पाऊसाची नोंद आम्बिया बहार मधील डाळिंब पिकाच्या नुकसान भरपाई साठी हे मंडळ पात्र


देवदैठण व पेडगाव मंडळात ५५ मि. मि पेक्षा जास्त पाऊसाची नोंद आम्बिया बहार मधील डाळिंब पिकाच्या नुकसान भरपाई साठी हे मंडळ पात्र

देवदैठण व पेडगाव मंडळात ५५ मि. मि पेक्षा जास्त पाऊसाची नोंद झाली आहे.आम्बिया बहार मधील डाळिंब पिकाच्या नुकसान भरपाई साठी हे मंडळ पात्र झाले आहे. अशी माहिती तालुका कृषी अधिकारी म्हस्के यांनी दिली आहे. 

श्रीगोंदा अंकुश तुपे (प्रतिनिधी) दि.२४: श्रीगोंदा शहर व जवळपास सर्वच तालुक्यात दुपारी तीन वाजेनंतर मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली.तीन तास मुसळधार पावसाने शहरातील रस्त्यांना ओढ्या-नाल्याचे स्वरूप येऊन घरांमध्ये पाणी घुसल्याने शहरातील नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली.शहरातील नवीन रस्त्यांची कामे उंचावर झाल्याने श्रीगोंदा-जामखेड या मुख्य रोडवरील बसस्थानक ते भैरवनाथ मंदिरापर्यंत रस्त्याला अक्षरशः ओढ्याचे स्वरूप आले. मुख्य रस्ता असूनही या रस्त्यावर गटारी, चेंबर नसल्याने व्यावसायिकांच्या दुकानात पाणी शिरून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

              श्रीगोंदा तालुका पर्जन्यछायेच्या प्रदेशात मोडतो. कायम दुष्काळी म्हणून गणला गेलेला तालुका घोड व कुकडीच्या लाभक्षेत्रामुळे राज्यात सर्वाधिक ७२%  सिंचन असलेला तालुका म्हणून आज गणला जातो. तरीही राजकारण व कुकडीच्या पाण्याचे योग्य नियोजना अभावी नेहमी शेतकरी संकटात असतो.परतीच्या मान्सूनवर अवलंबून असलेल्या तालुक्यावर यावर्षी मात्र वरुणराजाची सुरुवातीलाच चांगलीच कृपा दिसून येत आहे.निसर्ग चक्रीवादळ तालुक्याचे भाग्य उजळून गेले. तेंव्हापासून आजपर्यंत नियमितपणे ठराविक अंतराने पाऊस बरसत आहे.गुरुवारी रात्रीही पाऊस कमीअधिक प्रमाणात चालू होता. तालुक्यातील ओढे -नाले भरून वाहू लागले. शहरातील सरस्वती नदी, लेंडीनाला तसेच आढळगाव येथील देवनदी दुथडी भरून वाहू लागली.

            दुपारपर्यंत वातावरणात उकाडा जाणवत होता. दुपारनंतर काळ्याकुट्ट ढगांनी आकाश व्यापले व पाऊस सुरू झाल्यावर आभाळाचा काळा गाळ खाली कोसळत असल्याचा भास होऊ लागला. सततच्या पावसाने शेतकरी सुखावला आहे मात्र पावसाने मशागतीची कामे खोळंबली आहेत. शेतामध्ये तणांचा मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे. श्रीगोंदा शहरातील पावसाच्या पाण्याची निचरापद्धत सदोष असल्याने मोठ्या प्रमाणात घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे हाल झाले. नगरपालिकेने याबाबत तातडीने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.


- श्रीगोंदा शहरातील दौंड-जामखेड रस्त्यावरील कृषी संजीवनी या कृषी सेवा केंद्रात पाणी घुसल्याने खते व कृषी साहित्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. आढळगाव ता. श्रीगोंदा येथील देवनदी दुथडी भरून वाहू लागली.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News