नगरमध्ये आशा टॉकीज जवळ जुगार अड्ड्यावर छापा व १,००,४३०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त


नगरमध्ये आशा टॉकीज जवळ जुगार अड्ड्यावर छापा व १,००,४३०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) नगरमध्ये मध्ये कोतवाली पोलीस स्टेशन च्या भिती च्या मागील बाजूस असलेल्या देशपांडे हॉस्पिटल समोर एका निळ्या रंगाचे मोठे पंञ्याचे शेडचे आडोश्याला चालू असलेल्या जुगाराच्या आडेड्यावर उपविभागीय पोलीस अधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय व कर्मचारी यांनी छापा टाकला  दि २३ जुलै रोजी रोख रक्कम व ९  मोबाईल असा एकूण रु १,००,४३०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेण्यात आला. सदर कारवाईत एकूण ११ इसम गोलाकार बसून तिरट नावाचा हारजितीचा खेळ खेळत असताना रंगे हात पकडण्यात आले. यावेळी पोलिसांनी अचानक छापा घालून सर्व ११ इसम १) निलेश काळूराम काळे २८ वर्षे, २) सुधीर डॅनियल क्षत्रिय वय ५४ वर्षे ३) अमित बाळासाहेब चिंतामणी वय २६ वर्षे ४) शब्बीर आयुब शेख वय ३६ वर्षे ५) सलमान बशीर शेख वय ३० वर्षे ६) मोसीन इशामुद्दीन शेख वय ३४ वर्षे ७) नितीन अशोक शिर्के वय ३२ वर्षे ८) रितेश गोविंद मेडवाल वय ३० वर्षे ९) शब्बीर बशीर शेख वय ४४ वर्षे १०) प्रकाश अहमदलाल शहा वय ६२ वर्षे व ११) मयूर अर्जुन साळुंखे वय १९ वर्षे आशा इस्माना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील खेळात लावलेले रोख रक्कम रु २६,४३०/- व ९ मोबाईल हँडसेट अंदाजे रु ७४,०००/- किमतीचे असा एकूण १,००,४३०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पथकाला यश आले. यानुसार कोतवाली पोलीस स्टेशन येथे ll गु र नं ५३०५/२०२० भा. द. वि. क. १८८,२६९ सह महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) व साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ चे कलम ३ प्रमाणे कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला.

      सदरची कारवाई  मा. पोलीस अधीक्षक सो श्री अखिलेश कुमार सिंघ,  मा. अपर पोलीस अधीक्षक सो श्री सागर पाटील यांचे आदेश व Dy. SP संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली PSI प्रविण भोसले, PSI समाधान सोळंखे पो ना महेश मगर, पो शी आवारे, पो शी  परते व पो शी वडते यांनी केली. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News