चांदेकसारे येथे किसान दिवस शेतकऱ्यांना कर्ज वाटप करुन साजरा !


चांदेकसारे येथे किसान दिवस शेतकऱ्यांना कर्ज वाटप करुन साजरा !

 प्रतिनिधी संजय भारती

कुंभारी

चांदेकसारे येथील बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये किसान दिवसाचे औचित्य साधुन शेतकऱ्यांना दुग्ध किसान क्रेडिट कार्ड,किसान क्रेडिट कार्ड,तसेच सोने तारण कर्जाचे धनादेश साई आधार दुध संस्थेचे मार्गदर्शक  केशवराव होन यांच्या हस्ते देण्यात करण्यात आले.

कोपरगाव तालुक्यातील अग्रगण्य अश्या बँक ऑफ इंडीया चांदेकसारे शाखेत किसान दिवस साजरा करण्यात आला.या छोटेखानी कार्यक्रमास बँकेचे व्यवस्थापक रोहित वत्स बँकेचे सह व्यवस्थापक अमित आनंद उपसरपंच विजय होन किरण होन आनंद भालेराव दिगंबर होन अजित होन आदि सह परिसरातील शेतकरी वर्ग उपस्थित होता.

शासनाच्या कर्जमाफी योजनेत बसलेल्या बँकेतील ९२ शेतकऱ्यांपैकी ६० शेतकऱ्यांना बँकेने कर्ज वाटप केले असुन उर्वरित शेतकऱ्यांनाही ताबडतोब कर्ज वाटप करण्यात येणार असल्याची माहीती बँकेचे व्यवस्थापक रोहित वत्स यांनी दिली.तर साई आधार दुध संस्थेने दुध उत्पादक सभासदांची हमी घेउन ३० दुध उत्पादकांना संकरीत गाई खरेदी करून दुग्ध व्यवसाय वाढीसाठी बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करुन दिले असल्याचे साई आधार दुध डेअरीचे अध्यक्ष विजय होन यांनी यावेळी सांगीतले आहे. या योजनेचे परीसरातील शेतकरी वर्गातुन कौतुक होत आहे .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News