तूर्तास नगरमध्ये लॉकडाऊनची गरज नाही : पालकमंत्री हसन मुश्रीफ...करोना परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा


तूर्तास नगरमध्ये लॉकडाऊनची गरज नाही : पालकमंत्री हसन मुश्रीफ...करोना परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा

अहमदनगर प्रतिनिधी : अहमदनगर शहरासह जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात तसेच जिल्ह्यात लॉकडाऊन लागणार असल्याची चर्चा होत आहे. मात्र आज (दि.24 जुलै) पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नगरमध्ये घेतलेल्या आढावा बैठकीनंतर तूर्तास नगरमध्ये लॉकडाऊनची गरज नसल्याचे स्पष्ट केले. करोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा निर्वाळा देत त्यांनी लॉकडाऊन लागू करण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला. 

नगरमध्ये करोनाचे रूग्ण वाढत असल्याने खा.डॉ.सुजय विखे सातत्याने शहरात लॉकडाऊन करण्याची मागणी करीत आहेत. गुरुवारीही त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र देवून नगर शहर 5 दिवस लॉकडाऊन करण्याची मागणी केली होती. तातडीने निर्णय न घेतल्यास करोनाचा मोठा उद्रेक होण्याची भितीही खा.विखे यांनी व्यक्त केली आहे. मागील आठवड्यातही त्यांनी पाच ते दहा दिवसांचा लॉकडाऊन करण्याची गरज व्यक्त केली होती. खासदार लॉकडाऊनबाबत आग्रही असताना शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी मात्र प्रशासनाने प्रस्ताव दिल्यावर यावर भूमिका मांडण्याचे जाहीर केले होते. काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री मुश्रीफ यांनी घेतलेल्या आढावा बैठकीतही लॉकडाऊन लागू करण्याबाबत निर्णय झालेला नव्हता. यापार्श्वभूमीवर शुक्रवारी नगर दौर्‍यावर आलेल्या पालकमंत्री मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ,जिल्हाधिकारी राहुल दिवेदी ,खा.सुजय विखे, आ. संग्राम जगताप, आ.निलेश लंके,जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार , जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले ,जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप मुरंबीकर,जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे आदी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News