राहुरी फॅक्टरी येथील आदर्श पतसंस्थेने संजय कोबरणे या शेतकऱ्यास ट्रॅक्टर वितरित करून आदर्श निर्माण केला


राहुरी फॅक्टरी येथील आदर्श पतसंस्थेने संजय कोबरणे या शेतकऱ्यास ट्रॅक्टर वितरित करून आदर्श निर्माण केला

राहुरी फॅक्टरी प्रतिनिधी-विजय एस भोसले 

 सर्वसामान्य शेतकरी व्यापारी यांना नेहमीच मदतीचा हात पुढे करून त्यांच्या व्यवसायाला आर्थिक पाठबळ देणाऱ्या तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरि पतसंस्थेने संजय कोबरणे या शेतकऱ्यास ट्रॅक्टर वितरित करून आपला पुन्हा एकदा आदर्श निर्माण केला आहे.

            कोरोना करण्यासारख्या महामारी ने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी व्यापारी व सामान्य नागरिकही मोठ्या आर्थिक संकटात मध्ये सापडलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्या आदर्श कारभारातून नेहमीच आपला वेगळा ठसा निर्माण करणाऱ्या आदर्श नागरी पतसंस्थेने परिसरातील संजय कोबरणे या शेतकऱ्यास त्याच्या शेती व्यवसाय मदत व्हावी म्हणून पुढाकार घेत ट्रॅक्टर वितरित केला आहे व  त्याची आर्थिक घडी संपन्न होण्यासाठी पुढाकार घेतला आहे या ट्रॅक्टर चे वितरण संस्थेचे चेअरमन व देवळाली प्रवरा नगर परिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक अण्णासाहेब चोथे यांच्या शुभहस्ते नुकतेच संजय कोबरणे यांना ट्रॅक्टर ची चावी देऊन करण्यात आले यावेळी संस्थेचे संचालक आबासाहेब वाळुंज रामचंद्र काळे सुखदेव घुले किरण कोळसे मॅनेजर ज्ञानेश्वर सोनवणे संस्थेचे कर्मचारी दत्तात्रय मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News