नव्याने समाविष्ट झालेल्या या लोकवस्ती भागात मुलभुत सोयी सुविधांचा अभाव !! निसार भाई शेख


नव्याने समाविष्ट झालेल्या या लोकवस्ती भागात मुलभुत सोयी सुविधांचा अभाव !! निसार भाई शेख

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव शहरात अलीकडेच समाविष्ट केलेल्या भागातील लोक वस्तीत नगरपरिषदेमार्फत पुरविल्या जाणाऱ्या विज,पाणी यासारख्या इतर मुलभुत सुविधांचा अभाव असुन त्या लवकरात लवकर मिळाव्या या मागणीचे निवेदन भुमिपुत्र फाउंडेशनचे वतीने संस्थापक अध्यक्ष.निसार भाई शेख यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना दिले आहे. कोपरगाव शहराची मोठ्या प्रमाणात वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता कोपरगाव नगर परिषदेने शासनाकडे पाठपुरावा करत नगरपरिषद हद्द काही महिन्यांपूर्वी वाढवली असुन नव्याने सामील झालेल्या आदिनाथ सोसायटी,कर्मवीर नगर,दुल्हन वार्डवस्ती,गोकुळ नगरी,सह्याद्री कॉलनी,द्वारका नगरी भीमनगर,शंकरनगर,गवारे नगर या सोबतच इतर समाविष्ट झालेल्या परिसरात रस्ते,गटारी, स्ट्रीटलाईट,तसेच पिण्याची पाण्याची पाईपलाइन अश्या सुविधांचा अभाव असुन त्या लवकरात लवकर मिळाव्या.

 याकरीता अनेक वेळा आपण भुमीपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातुन एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने कोपरगाव नगरपरिषदेकडे आपले गाऱ्हाणे मांडत असुन लवकरात लवकर आपण आमच्या या भागातील वरील सुविधाकडे स्वतः जातीने लक्ष घालुन त्या पूर्ण कराव्या. असे या निवेदनात सामाजिक कार्यकर्त व भुमीपुत्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निसार शेख यांनी नमुद केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News