पुणे विठ्ठल होले (प्रतिनिधी) लॉक डाऊन काळात सर्वांनाच आर्थिक चणचण भासत आहे, परंतू पुण्यातील या दोन बाहद्दारानी मौजमजा मस्ती करण्यासाठी दुचाकी वाहनांची चोरी करण्याचा सपाटा लावला होता परंतू स्थानिक गुन्हे शाखा युनिट 5 च्या कर्तव्यदक्ष पोलिसांनी एका अल्पवयीन (विधिसंघार्शग्रस्त बालक) मुलासह एका आरोपीस अटक केली आहे.पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई यांच्या आदेशानुसार वाहनचोरी विषयी प्रतिबंध व्हावा यासाठी प्रत्येक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आदेश दिले होते त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत युनिट 5 यांनी वाहन चोरी करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती घेऊन सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे आणि त्यांच्या टीमला शोध मोहीम राबविण्यास सांगितले होते,त्यानुसार पोलीस कर्मचारी धनराज किरणाळे व दत्तात्रय बनसोडे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना खबऱ्या मार्फत पक्की खबर मिळाली की दोन व्यक्ती स्पेलंडर गाडी घेऊन हॉटेल कृष्णा व्हेज जवळ किवळे गावाकडे जाणाऱ्या रोडजवल असलेल्या डांबरी रस्त्याने जाणार असून त्यांच्याकडे असलेली गाडी चोरीची असल्याची खबर मिळाली,त्यानुसार युनिट 5 चे स पो नि राम गोमारे,पोलीस कर्मचारी धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसोडे,संदिप ठाकरे,मयुर वाडकर,गणेश मालुसरे,ज्ञानेश्वर गाडेकर,धनंजय भोसले,शामसुंदर गुट्टे यांनी त्याठिकाणी सापळा लावला असता,त्यांना पोलिसांची चाहूल लागताच ते गाडी टाकून पळून जाऊ लागले त्यांना टीमने पलत जाऊन पकडले व त्यांची कसून चौकशी केली असता त्यातील एकाचे नाव आकाश दशरथ शिंदे वय 20 राहणार पत्रशेड अजंठा नगर निगडी पुणे सांगितले तर दुसरा मुलगा अल्पवयीन आहे,त्यांचेकडे सखोल चौकशी केली असता आकाश याने या मुलासह वाकड,देहूरोड,पिंपरी,कोथरुड भागातील 7 दुचाकी मौजमजा करण्यासाठी चोरल्या असल्याचे सांगितले,त्यांच्याकडील सात ही गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत,या करवाई मध्ये पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई,अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,पोलीस उपायुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ,सहायक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सापोनी राम गोमारे तपास करीत आहेत.