पाच चारचाकी आणि दोन दुचाकी वाहनांची चोरी करणारे सराईत गुन्हेगाराच्या युनिट-2 ने आवळल्या मुसक्या


पाच चारचाकी आणि दोन दुचाकी वाहनांची चोरी करणारे सराईत गुन्हेगाराच्या युनिट-2 ने आवळल्या मुसक्या

विठ्ठल होले पुणे

पुणे प्रतिनिधी -- दुचाकी चोरी करणारे सराईत गुन्हेगार अक्सेस दुचाकीवरून संशयित रित्या फिरत असल्याची खबर पोलीस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार यांना मिळाली त्यानुसार भक्ती शक्ती चौकात सापळा लावला असता दोन आरोपी ताब्यात घेतले तर त्यांच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली.पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई यांनी परिसरातील वाढत्या वाहन चोरी करणाऱ्यांवर प्रतिबंध व्हावा या अनुषगाने सर्व गुन्हे शाखांना आदेश दिले होते त्यानुसार युनिट 2 चे पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांनी वाहन चोरी करणाऱ्या गुन्हेगारांची शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक संजय नीलपत्रेवार आणि पोलीस कर्मचारी यांचे विशेष पथक तयार करून आरोपींच्या शोधत पाठवले,त्यांचे सहकारी पो हवा चेतन मुंढे,प्रमोद वेताळ,जमीर तांबोळी,निगडी पोलीस ठाणे अंतर्गत पेट्रोलिंग करत असताना त्यांना खबऱ्या मार्फत माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी भक्ती शक्ती चौकात सापळा लावला असता MH 14 DZ 0526 या दुचाकीवरून चौकातून पवळे ब्रिजकडे जोरात जाताना दिसली त्यांचा पाठलाग करून ताब्यात  चौकशी केली असता त्यांनी पुढीप्रमाणे आपली नावे सांगितली 1) आकाश उर्फ पाप्या राजेंद्र सांडभोर वय 25 राहणार अंकुश आनंद बिल्डिंगच्या मागे संग्राम नगर झोपडपट्टी ओटास्किम  निगडी,2) सुजित उर्फ सुज्या भिवा गायकवाड वय 27 राहणार घर नंबर पी 16 सेक्टर 22 संजय नगर ओटास्कीम निगडी पुणे,त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन सांगितलेली माहिती धक्कादायक होती,त्यांच्याकडे असलेली अक्सेस दुचाकी जून महिन्यात प्रेमंकुर सोसायटी यमुनानगर येथून चोरल्याचे सांगून यांचा मुख्यसुत्रधार बंड्या उर्फ पुरुषोत्तम विर राहणार नांदेड सिटी सिंहगड रोड पुणे याचे सोबत यमुनानगर येथून मारुती झेन, सनसिटी पुणे येथून असेंट  हुंडई,दत्तवाडी पुणे येथून मारुती 800, सिंहगड रोड वडगाव फाटा रोड येथून मारुती झेन व ताथवडे उद्याना जवळून इस्टीम कार अशी चारचाकी वाहने चोरल्याचे कबूल करून,एक दुचाकी अरबाज हुसैन तलफदार राहणार ओटास्कीम निगडी याने चार महिन्यापूर्वी ट्रान्सपोर्टनगर येथून चोरल्याचे सांगितले,पोलीस उपनिरीक्षक संजय नीलपत्रेवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या आरोपीकडून पाच चारचाकी व दोन दुचाकी वाहने ताब्यात घेतले असून अजून सात गुन्हे उघडकीस आणले आहेत,ही कारवाई पोलीस कर्मचारी   शिवानंद स्वामी,केराप्पा माने,प्रमोद वेताळ, दिपक खरात,वसंत खोमणे,महिला पोलिस हवालदार उषा दळे,विपुल जाधव,चेतन मुंढे,जमीर तांबोळी,जयवंत राऊत,अतिशय कुडके,शिवाजी मुंढे नामदेव राऊत,अजित सानप यांनी केली. पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नीलपत्रेवार त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News