श्रीगोंदा (प्रतिनिधी) अंकुश तुपे:
श्रीगोंदा नगरपालिकेच्या दिनांक ९ जानेवारी १९९४ रोजी झालेल्या पहिल्याच निवडणुकीत जालिंदर (तात्या) तुकाराम घोडके नगरसेवक झाले होते.
जालिंदर घोडके हे श्रीगोंदा नगरपालिकेत सलग दोन पंचवार्षिक योजनेत नगरसेवक होते. त्यांचा नगरसेवक पदाचा कालावधी ९ जानेवारी १९९४ ते १२ जानेवारी २००४ अखेर होता. त्यांनी श्रीगोंदा नगरपालिकेत उपनगराध्यक्ष म्हणूनही काम केले. दोन महिन्यापूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले आणि गुरुवारी २३ रोजी तात्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते शीघ्र कवी होते त्याचप्रमाणे चांगले कलाकार होते.आंबेडकरवादी चळवळीचे ते खंदे पुरस्कर्ते होते.