श्रीगोंदा येथील १८ वर्षीय तरुणाने केली आत्महत्या!! बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे नैराश्य येऊन शेतात गळफास घेऊन आत्महत्या


श्रीगोंदा येथील १८ वर्षीय तरुणाने केली आत्महत्या!! बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे नैराश्य येऊन शेतात गळफास घेऊन आत्महत्या

शेडगाव ता. श्रीगोंदा येथील १८ वर्षीय तरुणाने बारावीच्या परीक्षेत  कमी गुण मिळाल्यामूळे नैराश्य येऊन शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.घटनेची श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.                       

श्रीगोंदा (प्रतिनिधी) अंकुश तुपे:

          शेडगाव येथील विजय उर्फ महेश तुकाराम राऊत या तरुणाला दहावीला असताना परीक्षेत ९१ टक्के मार्क मिळाले होते.तो बारावीला होता.काही दिवसांपूर्वी लागलेल्या बारावीच्या निकालात अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळाले होते. निकाल लागल्यापासून तो नैराश्याच्या गर्तेत गेला होता.गुरुवार दि.२३ रोजी सकाळी डेअरीवर दूध घालण्यासाठी म्हणून घरातून बाहेर पडला. परंतु घरी न येता त्याने शेतातील आंब्याच्या झाडाला दुधाच्या किटलीच्या दाव्याचा वापर करत गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.  याप्रकरणी खबर मिळताच श्रीगोंदा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. व श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार रोहिणी तोरडमल  करत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News