मुंगीतील दलीत वस्तीतील रस्त्याचे झालेले कामे निकृष्ट झालेली चौकशीत स्पष्ट


मुंगीतील दलीत वस्तीतील  रस्त्याचे झालेले कामे निकृष्ट झालेली चौकशीत स्पष्ट

◆विनामोबदला सदर कामे दुरुस्ती करण्याचे गटविकास अधिकाऱ्यांचे आदेश ---

 शेवगा़व प्रतिनीधी  सज्जाद पठाणशेवगाव तालुक्यातील मुंगी येथील दलीत वस्ती सुधार योजनेअंतर्गत मातंग वस्ती सिमेंट काँक्रीट रस्ता, झोपडपट्टी गावठाण रस्ता, बाजार तळ दलीत वस्ती रस्ता इत्यादी सिमेंट कॉंक्रीट रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट झाली असून, सिमेंट अत्यंत कमी वापरल्याने सगळी खडी वर येवून रस्त्याचा पृष्ठभाग पुर्णपणे उखडला गेला  आहे. याबाबत येथील माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गुलाबराव गव्हाणे व नितीन घोरपडे यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती शेवगाव यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे दि २६ मे रोजी २०२० रोजी तक्रार करून सदर नित्कृष्ठ झालेल्या  कामाची चौकशी करून संबंधित अधिकारी पदाधिकारी यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावेत अन्यथा  बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या गंभीर तक्रारीची दखल घेवून शेवगाव चे गटविकास अधिकाऱ्यांनी बांधकाम उपअभियंत्यास चौकशीचे आदेश दिले होते या झालेल्या चौकशीत रस्त्याचे विविध झालेली कामे नियम बाह्य निकृष्ट असल्याचे सिध्द झाल्याने संबंधित रस्ता पुन्हा दुरुस्त करण्याबाबत संबंधित ठेकेदार  साई कन्स्ट्रक्शन ( प्रो. बळीराम गरड.रा. शेकटे बु. ) यांना लेखी आदेश दिले आहेत सदरील कामाचा दोष निवारण कालावधी पुर्ण होण्याअगोदरच रस्ते खराब झाल्याने ठेकेदाराने स्वखर्चाने विना मोबदला दुरुस्ती करण्याचे आदेश गटविकास अधिकारी यांनी लेखी आदेश दिले आहेत .

दरम्यान, बळीराम गरड यांच्या साईकन्स्ट्रक्शन या संस्थेने शेवगाव तालूक्यात अनेक ग्रामपंचायतीच्या अंतर्गत रस्त्याची कामे केली असून ती अत्यंत निकृष्ट झाली आहेत. आधिकाऱ्यांना हाताशी धरून हि कामे केली जातात तक्रार करुनही ठेकेदारावर कार्यवाही होत नाही असा आरोप तक्रारदार गुलाब गव्हाणे,  नितीन घोरपडे, यांनी केला आहे 

ठेकेदाराला काळ्या यादीत टाका मुंगी येथे कामे करणारा सदरचा ठेकेदाराला तालुक्यात राजकीय वरदहस्त असल्याने त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही होत नाही सदर ठेकेदार आणी त्याच्या संस्थेला काळया यादीत टाकावे आणि तालुक्यात असंख्य  इतर गावात सुरू असलेऱ्या या ठेकेदाराच्या झालेल्या कामाची चौकशी करू सर्व कामे काढून घ्यावीत 

------------ गुलाबराव गव्हाणे, माजी उपसरपंच मुंगी.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News