निमगाव वाघात घरोघरी लोकमान्य टिळक जयंती साजरी


निमगाव वाघात घरोघरी लोकमान्य टिळक जयंती साजरी

वाळकी (प्रतिनिधी विजय भालसिंग) निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लोकमान्य टिळक यांची घरात व वाडी, वस्तीवर साध्यापध्दतीने जयंती साजरी केली. 

लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी ह.भ.प. भागचंद जाधव, प्र.मुख्याध्यापक किसन वाबळे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा निसर्ग व पर्यावरण मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष पै.नाना डोंगरे, अतुल फळके, भास्कर फळके, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, मयुर काळे आदि उपस्थित होते.

पै.नाना डोंगरे म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीत लोकमान्य टिळकांनी महत्त्वाची भूमिका बजावून समाज जागृतीचे कार्य केले. त्यांचे कार्य व विचार समाजाला दिशादर्शक आहे. आज स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठीअ जागृती होणे महत्त्वाची बाब बनली असून, स्वच्छतेने मनुष्याचे तर वृक्षरोपणाने निसर्गाचे आरोग्य उत्तम राहणार आहे. तसेच कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी नियमांच्या पालन करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. प्र. मुख्याध्यापक किसन वाबळे यांनी शिवजयंती व गणेशोत्सव साजरे करुन लोकमान्य टिळकांनी भारतीयांना एकत्र आनण्याचे कार्य केले. मात्र समाज पुन्हा जात, पंथ व धर्माच्या नावाखाली विभागला जात असून, त्यांना देशाच्या विकासासाठी एकत्र येण्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News