शेवगाव | नगर परिषदेने नागरी प्रश्नांची सोडवणूक करावी या मागणीचे निवेदन


शेवगाव | नगर परिषदेने नागरी प्रश्नांची सोडवणूक करावी या मागणीचे निवेदन

शेवगाव : नगर परिषदेने नागरी प्रश्नांची सोडवणूक करावी या मागणीचे निवेदन मु्ख्याधिकारी अंबादास गर्कळ यांना देताना संजय नांगरे, कमलेश लांडगे, डॉ. अमोल फडके, अशोक शिंदे व  सर्वपक्षीय कार्यकर्ते.

शेवगा़व प्रतिनीधी सजाद  पठाण

शहराच्या नागरी प्रश्नांवर  दि. ५ ऑगस्टला घंटानाद आंदोलनाचा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा इशारा 

शेवगावशहरात कोविड १९ महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नगर परिषदेने अस्वच्छता, पिण्याचे पाणी व इतर नागरी प्रश्नांची त्वरीत सोडवणूक करावी यासह अन्य मागण्यांसाठी नगर परिषदेसमोर  दि. ५ ऑगस्ट रोजी घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी दिला आहे. 

शेवगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ व नायब तहसिलदार मयूर बेरड यांना याबाबतचे निवेदन सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी गुरूवारी ( दि. २३ )  दिले. निवेदनात म्हंटले आहे की, शेवगाव नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांत पाणीसाठे , डबकी झाली असून कचरा साठल्याने अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव एकीकडे वाढत असताना डेंग्यू, मलेरिया व इतर जलजन्य आजारांचा धोका वाढला आहे. शहरातील घाणीचे साम्राज्य त्वरीत स्वच्छ करावे, पिण्याचा पाणी पुरवठा नियमीत व्हावा, प्रभाग वाईज निर्जंतुकीकरण मोहिम राबवावी, घरपट्टी व पाणी पट्टी व्याजरहित करावी व करवसुलीस तात्पुरती स्थगिती द्यावी. लॉकडाऊन काळातील  नगर परिषदेकडील गाळेभाडे , घरभाडे , पाणी पट्टी माफ करावी, महात्मा फुले भाजी मंडईत भाजीविक्रेते व शेतक-यांना मंडई विना मोबदला खुली करून द्यावी. अनधिकृत लिलाव रद्द करावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संजय नांगरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कमलेश लांडगे व समीर शेख, कॉंग्रेसचे डॉ. अमोल फडके, शाहू -फुले -आंबेडकर -साठे- कलाम सामाजिक विचार मंचाचे  अशोक शिंदे,  प्रविण भारस्कर आदींच्या सह्या आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News