तालुक्यातील अमरापूर येथे रोटरी कम्युनिटी कॉर्पसची स्थापना प्रसंगी शेवगाव रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा. किसनराव माने, सचिव बाळासाहे चौधरी व नूतन अध्यक्ष महेश लाडणे, दीपक भूकन आदी
शेवगा़व प्रतिनीधी सज्जाद पठाण-
तालुक्यातील अमरापूर येथे रोटरी कम्युनिटी कॉर्पसची शाखा स्थापन करण्यात आली असून शाखाध्यक्षपदी महेश लाडणे यांची तर सचिव पदीआदर्श शिक्षक दीपक भुक्कन यांची निवड झाली आहे.
रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीचे अध्यक्ष प्रा.किसनराव माने, माजी अध्यक्ष दिलीप फलके, सेक्रेटरी बाळासाहेब चौधरी यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यकारिणीत संतोष ढाकणे ( खजिनदार ), प्रदीप बोरुडे ( क्लब प्रशासक ), बाळासाहेब सुसे ( क्लब प्रशिक्षक ) , अनंत बोरुडे व संजय गरड ( कृषी विभाग ) , सचिन सुसे व गणेश गरड ( सॅनिटायझेशन ), गणेश सुसे व धनंजय खैरे ( आरोग्य व पर्यावरण ) , संदीप बोरुडे व संदीप खैरे ( साक्षरता ) ,अभिजित राऊत व संदीप बोरुडे ( जलव्यवस्थापन ) , तुषार सुसे व शरद खैरे ( युवक आघाडी ), संध्या पोटफोडे,सुनीता शेटे ( महिला सक्षमीकरण ) ,रवींद्र लाड ( व्यवसाय व रोजगार ) , दीपक थोरात,संदीप दुधाळ ( सांस्कृतिक ) , जालिंदर सुसे व कैलास कळमकर ( प्रसिद्धी ) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली