श्रद्धा, विश्‍वास असेल तर गुरुकृपा होणारच विसरलेला मोबाईल तासाभरातच घरपोहोच


श्रद्धा, विश्‍वास असेल तर गुरुकृपा होणारच  विसरलेला मोबाईल तासाभरातच घरपोहोच

नगर -(प्रतिनिधी संजय सावंत? लोन पे फोन जाहिरात पाहून वर्षभरापूर्वी घेतलेला मोबाईल जेव्हा विसरतो, तो मोबाईल त्याचाच आहे, असे समजून दुकानदार त्या व्यक्तीला हाकमारुन देतो, ती व्यक्ती आपलाच समजून घेऊन घरी जातो. अर्ध्या तासाने ज्यांचा फोन आहे ते पुन्हा फोन शोधण्यासाठी येतात तेव्हा फोन दुसर्‍याला दिला असे कळाल्यावर लोनवर घेतलेला फोन तर गेलाच पण आता मिळणार कसा? या प्रश्‍नाने व्यथित झालेले गृहस्थ शोधाशोध करु लागतात, पण सर्व व्यर्थ. शेवटचा पर्याय श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांवर असलेली श्रद्धा ठामपणे असलेला विश्‍वास अन् गुरुकृपा होईल या अपेक्षेने दर्शनाला जातात तेथे तुमचा फोन मिळाला, घरी जा, असा निरोप मिळताच भक्त लगेच दर्शन घेऊन घरी जातात.

     दरम्यान आज सकाळी 9.30 वा. वृत्तपत्र टाकत असतांना श्रीराम चौकातील अमित स्वीटच्या दुकानात प्रसादासाठी पेढे घेण्यासाठी मते थांबले. वरील खिशात असलेला मोबाईल काऊंन्टरवर ठेवून पैसे दिले. वितरणाच्या कामामुळे फोन तसाच राहिला हे दुकानदाराच्या लक्षात आले नाही. पेपर टाकताना अर्ध्या तासाने मते यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने दुकानात येऊन विचारले तेव्हा अमित खंडेलवाल यांनी एका ग्राहकाला मी हाक मारुन मोबाईल दिला असल्याचे सांगितल. मग शोधाशोध सुरु झाली. चौकात आजुबाजूला दुचाकीवर आलेला हा व्यक्ती कुठे दिसतो का पन काही शोध लागला नाही. शेवटी  मते  यांनी शिलाविहार येथील ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर मंदिरात जाऊन महाराजांना साकडं घातलं आणि खाली रिंगणेताईंना फोन आला मते यांचा मोबाईल सापडला.

     दर्शन घेऊन खाली येताच, ताईंचा निरोप मिळताच श्रद्धा, विश्‍वास असेल तर गुरुकृपा होणारच याचा प्रत्यय आला, असे मते यांनी सांगून घरी गेले तर ज्या व्यक्तीने मोबाईल चुकून आपला म्हणून नेला होता, त्याचा मोबाईल गाडीच्या डिक्कीत होता. फोन स्वीच ऑन झाल्याने मते यांना संपर्क करता येत नव्हता, पण ज्याला मोबाईल मिळाला, त्या व्यक्तीने फोन सुरु झालयावर शेवटचा कॉलावर संपर्क करुन माऊली गायकवाड यांना फोन कोणाचा आहे, असे विचारले; मते यांचा समजताच ते आमच्या गावात पेपर टाकायला येतात ते गजराजनगरला राहतात मी घरी पोहोच करतो, असे सांगितल्यावर माऊली यांनी रोज मी तेथे दर्शनाला जातो, म्हणून रिंगणे ताईंना संपर्क केला. अन् तेथे दर्शन घेतले तेथे निरोप मिळाला मोबाईल घरी पोहोच झाला.

     श्री मते यांनी सदर व्यक्तीची  भेट घेऊन बक्षीस देऊ केले. चहा तरी घ्या, पण त्या व्यक्तीने नाव  देखील न सांगता मोठ्या मनाने फोन देत निरोप घेतला. वृत्त देण्याचा एकच उद्देश कि माणसाने आपल्या गुरुंवर, देवावर श्रद्धा ठेवली, विश्‍वास ठेवला कि गुरुकृपा होतेच हा अनुभव आल्यामुळेहे वृत्त दिले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News