सुपे प्रतिनिधी / सचिन पवार
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कृषि उद्योग मूल शिक्षण संस्था, काऱ्हाटी येथे वृक्षारोपण करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा संपुर्ण परिसर नव्याने विकसित होत असून, यापूवीर्ही या ठिकाणी असणाऱ्या शेतजमीनींमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जवळपास 2400 फळझाडांची लागवड करण्यात आली आहे व आणखीन 7600 झाडांची लागवड येत्या वर्षभरात पूर्ण होणार आहे. तसेच संस्थेमध्ये आय. टी. आय. , इंग्लिश मिडीयम स्कूल, क्राॅप सायन्स, बँकिंग सारखे नवे अभ्यासक्रम या वर्षी सुरू होत आहेत.22जुलै वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच लाॅकडाऊन च्या सर्व नियमांचे पालन करत संस्थेचे सर्व पदाधिकारी, विविध विभागाचे प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निलमोहर, भावा, ताम्हण, शिरीष, यांसारख्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे,उपमुख्यमंत्री यांचे स्विय साहय्यक हनुमंत पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाअध्यक्ष संभाजी होळकर,जि. प. सदस्य भरत खैरे, राजेंद्र रायकर, शिरीष लोणकर, संजय जाधव , तसेच संस्थेचे पदाधिकारी, सर्व विभागांचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.