नागरीकांनी दर शनिवारी जनता संचारबंदी काटेकोर पाळावी !!विजय वहाडणे


नागरीकांनी दर शनिवारी जनता संचारबंदी काटेकोर पाळावी  !!विजय वहाडणे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

आजमितीला कोपरगाव शहर तसेच ग्रामिण भागात कोरोना बाधीतांची संख्या बघता कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी नागरीकांनी दर शनिवारी सुरू असलेल्या जनता संचारबंदीचे काटेकोर पालन करणे गरजेचे असल्याचे कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे.कोपरगाव शहरात तसेच ग्रामिण भागात झपाट्याने वाढणारा कोरोन संसर्ग थोपवयाचा असेल तर दर शनिवारी सुरू असलेल्या जनता संचारबंदीचे पालन मनापासुन करणे गरजेचे आहे. जिवनावश्यक सेवा हि महत्वाची च आहे परंतु कोरोनाच संकट हे बघता या दिवशी सर्व डॉक्टरांनी आपली हॉस्पिटल,मेडीकल स्टोअर्स बंद ठेवणे गरजेचे आहे. शहरातील IMA ने सुद्धा आपल्या सर्व डॉक्टरर्स ना दर शनिवारी लॉकडाउन ठेवण्याचा तसेच बाहेरगावाहुन एखादा कोरोना बाधीत रूग्ण शहरात आल्यास सर्व शहरवासियांना संसर्गाचा धोका निर्माण होउ शकतो या कारणाने बाहेरगावहुन आलेल्या रुग्णांना शनिवारी अपॉईंटमेट न देण्याच्या सुचना केल्या असुन एखादे गंभीर स्वरूपाचे पेशंट आल्यास तातडीने एखादे हॉस्पिटल तसेच मेडिकल स्टोअर्स उघडता येउ शकते असेही विजय वहाडणे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

कोपरगाव शहरातील कोरोनाचा प्रार्दुभाव असाच वाढत राही ल्यास शहरातील व्यवहार काही काळासाठी बंद ठेवावे लागु शकते.तरी शहरातील ज्या व्यापाऱ्यांची आर्थिक परीस्थिती चांगली आहे अश्या बडया व्यापाऱ्यांनी काही काळासाठी आपले व्यवहार स्वताहुन बंद ठेवण्यास काही हरकत नाही कारण सोशल डिस्टिंगशन चे पाळुन आपण कोरोनाला दुर ठेवु शकतो.तरी तमाम शहरवासियांनी प्रशासनाने लागु केलेले नियमांचे काटेकोर पणे पालन करुन आपल्या शहरास कोरोना पासुन दुर ठेवण्यास मदत करावी असे आवाहन वहाडणे यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News