१आॕगस्ट पुर्वी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा बसवावा– विवेक कोल्हे...


१आॕगस्ट पुर्वी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा बसवावा– विवेक कोल्हे...

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी  
सध्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव सुरू असुन लाॅकडाउनची कारणे सांगून कामे पुढे ढकलली जात आहे,परंतु लाॅकडाउनची परिस्थीती असतांनाही लाखो रूपयांची बीले काढण्यास नगरपालिकेने तत्परता दाखविली तशी तत्परता लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुतळा बसविण्यातही दाखवावी.
 सातत्याने वेगवेगळी कारणे देउन लोकशाहीर आण्णाभाउ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्याचा प्रश्न जाणीवपुर्वक रेंगाळत ठेवला आहे, समाजबांधवाच्या भावना तीव्र असल्याने येत्या १ आॕगस्ट पुर्वी कोपरगाव नगरपालिकेने पुर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी कोपरगाव औदयोगिक वसाहतीचे चेअरमन विवेक बिपीनदादा कोल्हे यांनी केली.माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांनी समाज बांधवाच्या भावना लक्षात घेउन शहरातील मध्यवर्ती जागेत लोकशाहीर आण्णाभाउ साठे यांचा पुतळा बसविण्यात आला होता,वर्षानुवर्षे प्रतिक्षेत असलेल्या या ऐतिहासिक घटनेमुळे समाजबांधवामध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले, परंतु मध्यंतरीच्या काळात कोपरगाव नगरपरिषदेने लोकआग्रहास्तव लोकशाहीर आण्णाभाउ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्याचे काम हाती घेतले.त्याबाबतचे सर्व कायदेशीर सोपस्कार पुर्ण केले,सदरच्या ठिकाणी असलेला अर्धाकृती पुतळा बाजुला काढून त्या ठिकाणी सुशोभिकरणाचे काम सुरू केले.परंतु सात महिन्यापासून अर्धाकृती पुतळा काढून देखील अदयापही नगरपालिका पुर्णाकृती पुतळा बसविण्यास चालढकल करीत असल्याचे दिसत आहे.सध्याच्या परिस्थितीत त्या ठिकाणी करण्यात येत असलेले सुशोभिकरणाचे कामही बंद पडलेले आहे.त्यामुळे नगरपालिका पुतळा बसविण्यास जाणीवपुर्वक विलंब करीत आहे. साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाउ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी विलंब न करता तातडीने १ आॕगस्ट २०२० पुर्वी नगरपालिकेने सुशोभिकरणाचे काम पुर्ण करून पुर्णाकृती पुतळा बसवावा अशी मागणी श्री कोल्हे यांनी केली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News