उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुपे येथे अनिल हिरवे यांच्या मार्फत पाच हजार मास्क वाटप, कोविड योध्दांचा सन्मान


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुपे येथे अनिल हिरवे यांच्या मार्फत पाच हजार मास्क वाटप, कोविड योध्दांचा सन्मान

सामाजिक कार्यकर्ते अनिल हिरवे मित्र परिवारामार्फत हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला 

सुपे प्रतिनिधी / सचिन पवार  

                  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संपुर्ण सुपे गावात सामाजिक कार्यकर्तें अनिलभैय्या हिरवे मित्र परिवारामार्फत प्रातिनिधीक स्वरूपात मास्क वाटप , तसेच कोविड योद्धांचा सन्मान करण्यात आला , यावेळी सुपे येथील जिल्हा परिषद प्राणांगणात हा कार्यक्रम पार पडला ,देश भरासह , राज्यात कोरोनाचा संसर्ग पाहता तसेच शासनाचा मास्क वापरा या संकल्पनेचा समर्थनात व शासनाचा मास्क न वापरण्याचा दंडास टाळण्यासाठी अनिल हिरवे मार्फत सुपे संपुर्ण गावासाठी मोफत मास्क वापराचे नियोजन करण्यात आले होते , हे मास्क सुपे गावातील ग्रामस्थांना घरोघरी पोहच करण्याचे देखिल नियोजन मित्र परिवारामार्फत करण्यात येणार आहे , तसेच याप्रसंगी कोरोना काळात प्रशासनाबरोबर खऱ्याअर्थाने झोकून कार्य करणाऱ्या रूग्णवाहिका चालक ,पोलीस प्रशासन , ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टर ,परिचारक, परिचारिका , प्रादेशिक ग्रामीणचे कर्मचारी , सुपे ग्रामपंचायत मधील स्वच्छता महिला कर्मचारी , सुपे ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी आदी कोविड योद्धाचा सन्मान करण्यात आला ,सुपे गावात आजपर्यत कोरोनाचा कोणताही रूग्ण न आढळल्याने या सर्व श्रेय माझ्या सर्व सन्मानित कोविड योध्दाना जाते असे उद्गार सरपंच स्वाती अनिल हिरवे यांनी मांडले ,यावेळी कवी हनुमंत चांदगुडे यांची झाड व्हयच दोघांनी या काव्यसंग्रहातील कवितेची स्वामी रामांनंद तीर्थ विद्यापिठाच्या बी ए अभ्यासक्रमात समावेश झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर , जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे , पंचायत समिती सभापती निता बारवकर ,सुपे गावाचा सरपंच स्वाती अनिल हिरवे ,उपसरपंच ज्योती जाधव ,युवक अध्यक्ष राहुल वाबळे ,सामाजिक कार्यकर्ते अनिल हिरवे , मा: जि.प सदस्य ज्ञानेश्वर कौले,  बी.के.हिरवे, मा सभापती शौकत कोतवाल ,संजय दरेकर,हनुमंत शेळके ,संपत काटे ,कालिदास भोंडवे ,संपत जगताप,अशोक लोणकर , अतुल खैरे मा.सरपंच मंदाताई खैरे सह ग्रामपंचायत सदस्य, अनिल हिरवे मित्र परिवाराचे सर्व मान्यवर आदी ग्रामस्थ, मान्यवर सोशल डिसटन्सचा नियमाचे पालन करून उपस्थित होते ,कार्यक्रमाची प्रस्तावना कल्पेश जगताप व सचिन भुजबळ यांनी आभार मानले .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News