निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या राज्य प्रसिध्दी प्रमुखपदी पै.नाना डोंगरे यांची नियुक्ती


निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या   राज्य प्रसिध्दी प्रमुखपदी पै.नाना डोंगरे यांची नियुक्ती

वाळकी (प्रतिनिधी विजय भालसिंग) नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील सामाजिक कार्यकर्ते पै.नाना डोंगरे यांची महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या राज्य प्रसिध्दी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. मंडळाचे राज्य अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी डोंगरे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी नासीर शेख, प्रमोद मोरे उपस्थित होते.  

डोंगरे यांच्या पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या कार्याची दखल घेत नुकतीच त्यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे त्यांना राज्याच्या कार्यकारणीवर संधी देण्यात आल्याचे मोरे यांनी सांगितले. पै.नाना डोंगरे यांचे पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण व संवर्धन, जलसंधारण, प्रदूषणमुक्तीसाठी विविध उपक्रम चालू आहेत. मागील वीस वर्षापासून ते सामाजिक चळवळीत कार्यरत आहे. पै.नाना डोंगरे यांनी ग्रामीण भागात पर्यावरण संवर्धन व प्रदूषणमुक्तीसाठी जनजागृती करुन विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची भावना व्यक्त केली. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.पै . नाना डोंगरे यांनी आपल्या जन्मभूमी निमगाव  वाघा गावाचे नाव लौकीक केले . कसलाही राजकीय  वारसा नसतानाही त्यांनी आपल्या कार्योची आगळी वेगळी समाजात छबी निर्माण केली . नोकरी सांभाळून ते विविध सामाजिक उपक्रम राबविल्याने या सामान्य व्यक्तीने आता पर्यन्त विविध पदे पर्यन्त मजल मारल्याने त्यांतच त्यांचा झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम पंचकोर्षीत चर्चेचा ठरला असून अशा या निसर्ग प्रेमी माणसाला त्यांच्या आवडीचे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी निवडीचे गावकऱ्यामध्ये कुतुहलाचा विषय झाल्याने खऱ्या मनाने पै .नाना डोंगरे हे समाजसेवा करीत आहेत .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News