भाईसथ्था नाईट हायस्कूलच्या 12वीच्या गुणवन्त विद्यार्थ्यांचा सत्कार


भाईसथ्था नाईट हायस्कूलच्या 12वीच्या गुणवन्त विद्यार्थ्यांचा सत्कार

हिंदसेवा मंडळाच्या ज्युनिअर कॉलेज,भाईसथ्था नाईट हायस्कूलमध्ये 12वीच्या गुणवन्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी भाईसथ्था नाईट हायस्कूलचे चेअरमन डॉ.पारस कोठारी, प्राचार्य सुनिल सुसरे,दादा चौधरी मराठी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष येवले, देविदास खामकर,प्रा.शरद पवार,अशोक शिंदे,बी.एस.गोर्डे,संदेश पिपाडा आदी.(छाया-अमोल भांबरकर)     

रात्र प्रशालेतील विद्यार्थ्यांची उज्वल यशाची परम्परा कायम-डॉ.पारस कोठारी                                                  

नगर-(प्रतिनिधी संजय सावंत) भाईसथ्था रात्र प्रशालेतील विद्यार्थ्यांनी दिवसा कष्ट करून रात्रीच्या शाळेत मेहनतीने व परिश्रमाने, जिद्दीने १२वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले हि कौतुकास्पद बाब आहे.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रात्र प्रशालेतील विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परम्परा कायम राखली आहे.१२वीच्या परीक्षेत मुलींची सरशी दिसत आहे.भाईसथ्था नाईट हायस्कूलचा १२वी चा निकाल कला शाखा-६७.२७टक्के व वाणिज्य शाखा-५४.५४ टक्के लागला.या यशामुळे हिंदसेवा मंडळाच्या नावलौकिकात भर पडली आहे.असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे उपकार्याध्यक्ष तथा भाईसथ्था नाईट हायस्कूलचे चेअरमन डॉ.पारस कोठारी यांनी केले.

 हिंदसेवा मंडळाच्या ज्युनिअर कॉलेज,भाईसथ्था नाईट हायस्कूलमध्ये 12वीच्या गुणवन्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी हिंदसेवा मंडळाचे उपकार्याध्यक्ष तथा भाईसथ्था नाईट हायस्कूलचे चेअरमन डॉ.पारस कोठारी बोलत होते.याप्रसंगी दादा चौधरी मराठी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष येवले ,प्राचार्य सुनिल सुसरे,देविदास खामकर,प्रा.शरद पवार,अशोक शिंदे,बी.एस.गोर्डे,संदेश पिपाडा, प्रा.संजय साठे,प्रा.साईनाथ थोरात,अनिरुद्ध देशमुख,मनोज कोंडेजकर आदी उपस्थित होते.   संस्थेचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक,कार्याध्यक्ष अजित बोरा,मानद सचिव संजय जोशी व माजी मानद सचिव सुनील रामदासी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.                                    

भाईसथ्था नाईट हायस्कूलचा १२वी चा निकाल कला शाखा-६७.27% गुणानुक्रमे प्रथम ३ पुढीलप्रमाणे १)शेख सिमरन-७४% २)प्रणवसिंग परदेशी-७०.६१% ३)कांचन गायकवाड -६७.३८% तसेच १२वी वाणिज्य शाखा-५४.५४ % गुणानुक्रमे प्रथम ३ पुढीलप्रमाणे१)कीर्ती पंडित -६०.९२% २)सलीम बागवान -६०.७७%३)नामदेव जंगम -६०%.विशेष श्रेणीत (२०विद्यार्थी)द्वितीय श्रेणीत (३९ विद्यार्थी) आले आहेत.एकूण ९९ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट ६१ विद्यार्थी.               सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व विद्यालयातील शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांचे संस्था पदाधिकारी ,चेअरमन व शालेय समिती सदस्य,प्राचार्य आदींनी अभिनंदन केले.सूत्रसंचालन प्रा.शरद पवार यांनी केले तर आभार प्राचार्य सुनील सुसरे  यांनी मानले.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News