गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालयात आजपासून "गुरू आनंद कोव्हिड सेंटर" सुरू करण्यात आले आहे - आमदार संग्रामभैय्या जगताप


गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालयात आजपासून "गुरू आनंद कोव्हिड सेंटर" सुरू करण्यात आले आहे - आमदार संग्रामभैय्या जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) 

याप्रसंगी बोलताना आमदार संग्रामभैय्या जगताप म्हणाले की, शहरातील युवकांनी पुढे येऊन माझ्याकडे कोव्हिड सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यांना मी आयुर्वेद महाविद्यालयातील यंत्रणा दिली. चांगल्या विचारांचे अनुकरण नवीन पिढीने करावे. १५ ऑगस्टपर्यंत नागरिकांना मास्कपासून स्वातंत्र्य मिळेल, अशी आशा यावेळी आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी व्यक्‍त केली. 

गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालयात आजपासून गुरू आनंद कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरच्या उद्‌घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे अध्यक्ष तथा आमदार अरुणकाका जगताप, आमदार संग्रामभैय्या जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, महापालिकेचे विरोधीपक्ष नेते संपत बारस्कर, नगरसेवक गणेश भोसले, महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, डॉ. विजय भंडारी, प्राचार्या डॉ. अंजली देशमुख, रोशन चोरडिया, डॉ. आशिष भंडारी विपुलभाई शेटीया, विशाल शेटीया आदी उपस्थित होते. यापुढे बोलताना आमदार संग्रामभैय्या जगताप म्हणाले की, कोरोना काळात आम्ही शेवटच्या घटकापर्यंत जीवनावश्‍यक वस्तूंची मदत पोचविण्याचा प्रयत्न केला. नगरमधील पोलिस दलानेही सेवाभावी वृत्तीने काम करत नगरची प्रतिमा उंचावण्याचे काम केले. गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय व गुरु आनंद फाउंडेशने हे सेंटर सुरू केले आहे. या सेंटरला जितो अहमदनगर, सकल राजस्थानी युवा मंच, बडीसाजन युवक संघ, जय महावीर युवक मंडळ, महावीर प्रतिष्ठान या सात संस्थांचे सहकार्य मिळत आहे. या सेंटरमध्ये सकाळी रुग्णांना योग शिकविले जाणार आहेत. गुणे आयुर्वेद महाविद्यालयाने तयार केलेला आयुष काढा रुग्णांना देण्यात येणार आहे. दिवसातून तीन वेळा जेवण देण्यात येणार असून त्यात रोज वेगळा "मेनू" असणार आहे. या सेंटरमध्ये रुग्णांना अल्पदरात ही सुविधा उपलब्ध होणार आहे. आयुष काढ्याविषयीची माहिती डॉ. सुरजसिंह ठाकूर यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्तविक अमित मुथा यांनी केले. कमलेश भंडारी यांनी सूत्रसंचालन केले, शैलेश मुनोत यांनी आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News