विठ्ठल होले पुणे प्रतिनिधी
मा . जिल्हाधिकारी सातारा यांनी तपासणी नाक्यावर कार्यरत असणाऱ्या शिक्षक व आरोग्य कर्मचारी यांना बारा तासाची ड्युटी दिनांक 15 जुलै2020 पासून दिलेली आहे .ही बाब शिक्षक व आरोग्य कर्मचारी यांच्यावर अन्याय करणारी व मानसिक खच्चीकरण करणारी आहे . याबाबत मा. जिल्हाधिकारी सातारा यांच्याशी वेळोवेळी संपर्क केला असून त्यांनी अद्याप आठ तासाची ड्युटी करण्याचे दिलेले आश्वासन पाळले नाही . ही बाब मा. बाळासाहेब पाटील सहकारमंत्री तथा पालकमंत्री सातारा यांच्याशी संपर्क साधून यांच्या निदर्शनास आणून दिली . मंत्री महोदयांनी मा . जिल्हाधिकारी सातारा यांच्याशी बोलून तपासणी नाक्यावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आठ तासाची ड्यूटी करण्याचे आश्वासन दिले आहे . यापूर्वी सांगली ,पुणे व अहमदनगर जिल्ह्यात तपासणी नाक्यावर कार्यरत असणाऱ्या शिक्षकांचा मृत्यू झालेला आहे .बारा तासाची ड्युटी कर्मचाऱ्यांसाठी अन्याय कारक आहे व कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करणारी आहे .कामगार कायद्यानुसार कर्मचाऱ्यांना आठ तासापेक्षा जास्त ड्युटी देता येणार नाही ही बाब विचारात घेऊन जिल्हा प्रशासनाने तपासणी नाक्यावरील कार्यरत शिक्षक व आरोग्य कर्मचारी यांची आठ तासाची ड्युटी करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ प्रणित शिक्षक आघाडीचे राज्य महासचिव गौतम कांबळे यांनी मा . बाळासाहेब पाटील सहकारमंत्री तथा पालकमंत्री सातारा यांच्याशी संपर्क साधून केली आहे