शेवगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघ व सदिच्छा मंडळाच्या पदाधिका-यांचे राजीनामे - विनोद फलके


शेवगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघ व सदिच्छा मंडळाच्या पदाधिका-यांचे राजीनामे  - विनोद फलके

शेवगाव (प्रतिनिधी) सज्जाद पठाण: काही अपप्रवृत्तीचे लोक संघटनेला अडचणीत आणत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व सदिच्छा मंडळाच्या शेवगाव शाखेच्या पाच पदाधिका-यांनी आपल्या पदाचे राजीनामे वरिष्ठांना सादर केले आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षक बॅंकेचे माजी संचालक विनोद फलके यांनी दिली.

फलके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की,  शेवगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघ व सदिच्छा मंडळाने गेल्या पाच वर्षांत प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवत संघटना मजबूत व भक्कम केली. परंतु अपप्रवृत्तीचे लोक संघटनेला अडचणीत आणण्यात गुंतले आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव शेवगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष रामकृष्ण काटे, सदिच्छा मंडळाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग नागरे, पदवीधर शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, उच्चाधिकार समीतीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब कोरडे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष शुभांगी शेलार यांनी सर्व पदाचे राजीनामे वरिष्ठांकडे सादर केले आहेत.

या वेळी राज्य प्राथमिक संघाचे उपाध्यक्ष  भाऊराव जावळे,  शिक्षक संघाचे माजी तालुकाध्यक्ष भिमराव बामदळे, सदिच्छा मडळाचे माजी अध्यक्ष बबनराव ढाकणे, रमेश खरात तसेच  सदिच्छा प्रेमी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News