पुणे प्रतिनिधी विठ्ठल होले :
दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक होतो आहे,रुग्णांची वाढती संख्या धोक्याचा इशारा आहे,कोरोनाचं कहर होत आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना विषयी तर्क वितर्क वरतवले जात आहेत,हा आजार अस्तित्वातच नाही त्याला काय घाबरायचे,या रोगाने काहीच होत नाही असे वेगवेगळे मेसेज रोज फिरत आहेत,त्यामुळे काही लोक संभ्रमावस्थेत आहेत,नक्की काय करायचे अशा मेसेज मुळे लोक गांभीर्याने दखल घेत नाहीत आणि परिणाम असा होतो आहे की रोजच रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे,यवत,खामगाव बीट मधील 85 लोकांचे स्वाब घेण्यात आले होते त्यापैकी पत्रा कंपनी केडगाव येथील 8 जण कोरोना बाधीत आढळले,चंदनवाडी 2, सहजपुर 4, कासुर्डी 2, वरवंड 2,खुटबाव 1, यवत (RH)1,नांदूर 1 असे एकूण 21 जण पोझीटीव आल्याचे आरोग्य अधिकारी डॉ अशोक राजगे यांनी सांगितले,तर दौंड शहरात पुन्हा या रोगाने डोके वर काढले असून शहरातील SRP जवानांसह 109 लोकांचे स्वाब तपासणी साठी पाठवले होते त्यापैकी 19 शहरातील आणि 3 SRP चे जवान असे 22 व्यक्तीं कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याचे दौंड उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डॉ संग्राम डांगे यांनी सांगितले,त्यामुळे एकाच दिवसात शहरासह तालुक्यात 43 जण कोरोना बाधीत आले आहेत. या आकडेवारी मुळे दोन दिवसात शहरासह तालुक्यात कोरोनाने 75 गाठली आहे, रुग्णांची ही वाढती लोकसंख्या पहाता भविष्यात याचा खूप त्रास होणार आहे,त्यामुळे जनतेनेच काळजी घेतली पाहिजे,प्रशासन,आरोग्य विभाग,पोलीस त्यांचे काम करत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जनतेने सहकार्य करणे महत्वाचे आहे.